श्री चैतन्य एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्सद्वारे भारतातील सर्वांत मोठी शिष्यवृत्ती परीक्षेची घोषणा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑगस्ट २०२२ । मुंबई । स्पर्धात्मक दृष्टिकोनातून कौशल्ये वाढवणारी, प्रतिष्ठित आणि उच्च दर्जाचे शालेय शिक्षण देणारी, शिष्यवृत्तीसह जेईई मेन, जेईई अॅडव्हान्स्ड किंवा एनईईटीसारख्या फांऊंडेशन कोर्स आणि चाचणी परीक्षा करून घेणारी, भारतभर पसरलेल्या प्रेरित विद्यार्थ्यांची परिसंस्था श्री चैतन्य एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्सने भारतातील सर्वांत मोठी शिष्यवृत्ती परीक्षा ‘स्कोअर स्टेम चॅलेंज स्कॉलरशिप २०२२’ची घोषणा केली आहे.

दरवर्षी क्रमवारीत आघाडी राखणारे विद्यार्थी देणारी, ३६ हून अधिक वर्षांच्या शैक्षणिक उत्कृष्टता व कौशल्याचे पाठबळ असलेली, श्री चैतन्य यांची स्कोअर स्टेम चॅलेंज २०२२ ही परीक्षा देशातील सर्वांत कुशाग्र बुद्धीमत्ताधारकांना पुढे आणण्यास सज्ज आहे, जेणेकरून यशाची संभाव्यता वाढू शकेल. शालेय प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या, फाउंडेशन कोर्सेस तसेच जेईई मेन, जेईई अॅडव्हान्स्ड व एनईएफटीसारख्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या आणि ऑनलाइन-ऑफलाइन अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती घेऊ इच्छिणाऱ्या, इयत्ता १ ते १३ मधील विद्यार्थ्यांसाठी हे व्यासपीठ आहे.

भारतातील सर्वांत मोठ्या, १००० कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीच्या, लोगोचे अनावरण नुकतेच करण्यात आले. केवळ नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे दर्जेदार शिक्षणाच्या संधी प्राप्त करण्यात अडथळे जाणवणाऱ्या गुणवान विद्यार्थ्यांना शोधणे व त्यांना मदत करणे हे स्कोअरचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या परीक्षेत आघाडीचे क्रमांक पटकावणाऱ्यांना सुवर्ण मानकांची मेंटॉरशिप (मार्गदर्शन) उच्च अर्हताधारक अध्यापकांद्वारे तसेच आयआयटी/नीट/एम्स यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी सर्वोत्तम प्रशिक्षण पुरवले जाईल.

इन्फिनिटी लर्नच्या सह-संस्थापक तसेच श्री चैतन्य एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनच्या शैक्षणिक संचालक सुषमा बोपण्णा  म्हणाल्या, “स्कोअर स्टेम चॅलेंज स्कॉलरशिप २०२२ हा श्रीचैतन्य ग्रुपसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे, कारण हे प्रतिभा, अभिक्षमता व कौशल्ये जोपासण्यासाठी संस्था अनेक दशकांपासून करत असलेल्या प्रयत्नांचे प्रतीक आहे. उद्याचे नेते शोधणे, ओळखणे, त्यांना प्रशिक्षण देणे व तयार करणे हे संस्थेचे ध्येय आहे. श्री चैतन्य ग्रुप अविश्रांतपणे उद्योगक्षेत्रातील आघाडीचे उपक्रम राबवत आहे, नवोन्मेष्कारी पद्धतींचा तसेच सूचना प्रणालींचा अवलंब करत आहे आणि त्यायोगे शिक्षणक्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे.”


Back to top button
Don`t copy text!