दैनिक स्थैर्य । दि.०४ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । भारतातील आघाडीची डिजिटल पेमेण्ट्स व आर्थिक सेवा कंपनी पेटीएमची मालक वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने आज त्यांच्या व्यासपीठाच्या माध्यमातून एलपीजी सिलिंडर्स बुक करणाऱ्या युजर्ससाठी आकर्षक डील्सची घोषणा केली आहे. याअंतर्गत विद्यमान पेटीएम युजर्सना मोफतपणे सिलिंडर मिळण्याची संधी आहे. त्यांना फक्त पेटीएम ऍपवर पेमेण्ट प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी कूपन कोड ‘FREEGAS’चा वापर करायचा आहे.
देशभरातील लाखो युजर्स त्यांचे एलपीजी सिलिंडर्स बुक करण्यासाठी सोईस्करपणे पेटीएमचा वापर करत आहेत. या नवीन ऑफरसह नवीन युजर्सना त्यांच्या पहिल्या बुकिंगवर ३० रूपयांची कॅशबॅक मिळू शकते. त्यांना फक्त पेटीएम ऍपवर पेमेण्ट भरताना प्रोमोकोड ‘FIRSTCYLINDER’चा वापर करायचा आहे. ही कॅशबॅक ऑफर इंडेन, एचपी गॅस आणि भारत गॅस या तिन्ही प्रमुख एलपीजी कंपन्यांच्या सिलिंडर बुकिंगवर लागू आहे. युजर्सना पेटीएम पोस्टपेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेटीएम नाऊ पे लेटर उपक्रमामध्ये नोंदणी करत सिलिंडर बुकिंगसाठी पुढील महिन्यामध्ये पेमेण्ट करण्याची सुविधा देखील मिळेल.
नुकतेच कंपनीने युजर्सना त्यांच्या गॅस सिलिंडर्सच्या डिलिव्हरीवर देखरेख ठेवणाऱ्या, तसेच रिफिल्ससाठी ऑटोमेटेड इंटेलिजण्ट रिमांइडर्स देणाऱ्या नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांची भर करत सिलिंडर बुकिंग अनुभवामध्ये वाढ केली. पेटीएमच्या विनासायास व सुलभ बुकिंग प्रक्रियेने एलपीजी सिलिंडर बुकिंग प्रक्रिया अत्यंत सुलभ केली आहे. युजरला फक्त एवढेच करायचे आहे की ‘बुक गॅस सिलिंडर’ टॅबवर जाऊन गॅस प्रदाता निवडावे, मोबाइल क्र. / एलपीजी आयडी/ग्राहक क्र. प्रविष्ट करावा आणि त्यानंतर पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, कार्ड्स व नेट बँकिंग्स अशा त्यांच्या पसंतीच्या पेमेण्ट मोडचा उपयोग करून पेमेण्ट करावे. जवळच्या गॅस एजन्सीकडून सिलिंडर नोंदणीकृत पत्त्यावर डिलिव्हर केला जातो.