दैनिक स्थैर्य । दि. ०२ मार्च २०२३ । मुंबई । यावर्षी राज्यात होणाऱ्या कॅन्टोन्मेंट निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे निवडणूक प्रमुखांची घोषणा केली आहे. निवडणूक प्रमुख असे आहेत – पुणे – आ . सुनील कांबळे, शिवाजीनगर – आ. सिद्धार्थ शिरोळे, देहू – माजी आमदार संजय ( बाळा ) भेगडे , देवळाली ( जि. नाशिक ) – बाळासाहेब सानप, अहमदनगर – महेंद्र ( भय्या ) गंधे , छत्रपती संभाजीनगर – संजय केनेकर , नागपूर – डॉ. राजीव पोतदार .