गजानन सुझुकी तर्फे वर्धापन दिनानिमित्त ऑफर


स्थैर्य, सातारा, दि. १३ : सुझुकी मोटोरसायकल व स्कुटर्सचे जिल्ह्याचे अधिकृत विक्रेते गजानन सुझुकी व सुझुकी कंपनीतर्फे बाराव्या वर्धापनदिनानिमित्त ग्राहकांसाठी आकर्षक योजना आणल्या आहेत . नवीन ऑलराऊंडर सुझुकी  मोठी डिकी स्पेस ६४ किलोमीटर मायलेज, पॉकेट व आरामदायी लेग स्पेसमुळे स्त्रिया व ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत सोयीची ठरते.

कोणतीही जुनी सुझुकी गाडी बदलून नवीन घेतल्यास  किमान रु. ३०००/- पर्यंतचा डिस्काउंट व कार्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी किमान रु. ३०००/- पर्यंतचा डिस्काउंट दिला जाणार आहे.  रोख रकमेवर वर रु. ८५००/- पर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे.  वर्धापन दिनानिमित्त सुझुकी गाडीवर कमीत कमी व्याजदर ७.८६% आहे, तसेच नामवंत फायनान्स कंपन्यांमार्फत ९० टक्क्यांपर्यंत कर्ज व पाच वर्षापर्यंत ऐच्छिक वॉरंटी उपलब्ध आहे.

BS -6 ची सर्व मॉडेल्स उपलब्ध आहेत. Access, Burgman, Gixxer, Gixxer Sf, Intruder हि सर्व मॉडेल्स FI व ABS सिस्टीम  मध्ये तसेच  SEP व SOCS टेकनॉलॉजि मध्ये उपलब्ध आहेत.  शहरातील ग्राहकांसाठी सरस्वती बिल्डिंग कमानी हौद, गुरुवार पेठ सातारा येते शहर शाखा सुरु केली असून , लवकरच तेथे सर्व्हिस व स्पेअर्स सुविधा सुरु केली जाणार आहे.

गजानन सुझुकीने गेले  १२ वर्ष  २०,०००/- पेक्षा जास्त ग्राहकांना सेवा दिली आहेत. पश्चिम महाराष्ट्रात १२ वर्षात सुझुकीचे नामांकित डिलर असा नावलौकीक मिळवला आहे. सुझुकीतर्फे उत्कृष्ट परफ़ॉमन्ससाठी गजानन सुझुकीला अनेक वेळा विविध पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.

गजानन सुझुकीचा वर्धापनदिन १९ जुलै रोजी आयोजित केला आहे असे गजानन सुझुकीचे संचालक  सचिन शेळके यांनी केली आहे. अधिक माहितीसाठी गजानन सुझुकी सातारा, फलटण, वाई , कोरेगाव, नागठाणे, पाचवड, मेढा या शोरूमशी संपर्क साधावा.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!