
दैनिक स्थैर्य । 10 जुलै 2025 । फलटण । सातार्यातील सर्वात जुनी व प्रतिष्ठित टू व्हीलर डीलरशिप गजानन सुझुकीला 17 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ग्राहकांना नवीन वाहन खरेदीवर ऑफर्स देण्यात येणार आहे, अशी माहिती गजानन सुझुकीचे संचालक सचिन शेळके यांनी दिली.
सचिन शेळके म्हणाले, गजानन सुझुकीने गेली 16 वर्ष 35 हजारपेक्षा जास्त ग्राहकांना सेवा देत आहे. पश्चिम महाराष्ट्रात 16 व्या वर्षांत सुझुकीचे नामांकित डीलर असा नावलौकिक मिळविला आहे. सुझुकीतर्फे गजानन सुझुकीला अनेक वेळा उत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ग्राहकांना सुझुकी दुचाकीच्या खरेदीवर सर्व विशेष ऑफरचा भरघोस फायदा मिळणार आहे.
तरुणांपासून ते गृहिणीपर्यंत सर्वांच्याच आवडीच्या सुझुकी ऍक्सेससोबत नव्या प्रवासाची नवी सुरुवात फक्त चार हजार 999 रुपये भरून गाडी घरी घेऊन जाण्याची संधी ग्राहकाला मिळणार आहे. सुझुकीच्या सर्व बाईक खरेदीवर विशेष ऑफर व एक्स्चेंज सुविधा ठेवण्यात आलेली आहे. कोणतीही जुनी दुचाकी घेऊन या व बाजारभावापेक्षा जास्त किंमत मिळवा. नवीन सुझुकी गाडी घरी घेऊन येण्याची संधी या निमित्ताने ग्राहकांना मिळणार आहे.
गजानन सुझुकीमध्ये नामवंत फायनान्स कंपन्यांमार्फत 6.99% पासून सुझुकी गाडी खरेदी करण्यासाठी 100 टक्के पर्यंत लोन उपलब्ध होणार आहे. ग्राहकांनी अधिक माहितीसाठी गजानन सुझुकीच्या सातारा, फलटण, कोरेगाव, वाई, शिरवळ, पुसेगाव, नागठाणे येथील शोरूमशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.