आचार्य अकॅडमी चा वर्धापन दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ जुलै २०२३ । बारामती । येथील आचार्य अकॅडमी चा सहावा वर्धापन दिन निमित्त व्याख्यान व गुणवंत विद्यार्थी, पालक यांचा सन्मान करण्यात आला .या प्रसंगी आचार्य अॅकॅडमीचे संचालक प्रा. ज्ञानेश्वर मुटकुळे, प्रा. सुमित सिनगारे, कमलाकर टेकवडे आणि प्रा. प्रवीण ढवळे यांच्यासह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.शिक्षण म्हणजे केवळ उदरनिर्वाहाचे नाही तर जगण्याचा अर्थ कळून घेण्यासाठीचे साधन आहे. मात्र त्यासाठी तितक्या तळमळीने शिकले पाहिजे. मार्कांच्या आणि नोकरीच्या पलिकडे जाऊन शिक्षणाकडे पाहिले पाहिजे. असे प्रतिपादन व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले.  १७२९आचार्य अॅकॅडमी  च्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘ गुरुमंत्र यशाचा आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा’ या कार्यक्रमात शिंदे  बोलत होते. पुणे ते सिंगापूर हा बुलेटवरचा प्रवास, परत येताना वाराणसी येथे झालेला गंभीर अपघात, त्यातून आलेल्या शारिरिक आणि मानसिक दौर्बल्यातून पुन्हा उभे राहून स्वत:चा आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यवसाय उभा करणे, यासोबतच आपले छंद आणि सामाजिक भान जोपासणे हा आपला जीवनप्रवास  डॉ. सतीलाल पाटील यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडला. त्या अनुभवातून विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा दिली. हे वय आपले उद्दिष्ट निश्चित करण्याचे आहे. मोठ्यात मोठे उद्दिष्ट ठरवा, त्यातही आर्थिक संपन्नता, सामाजिक भान, शारिरिक आणि मानसिक सुदृढता आणि आपले कुटुंब याला प्राधान्य द्या. केवळ उद्दिष्ठ ठरवून थांबू नका तर ते त्याची कालमर्यादा ठरवा आणि अगदी आतापासून ते उद्दिष्ट गाठण्यसाठी आपण काय करणार त्याचा रोडमॅपही ठरवून त्याप्रमाणे प्रत्यक्षात काम करण्याचाही सल्ला डॉ सतीलाल पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांच्या यशात ९० टक्के त्याचा स्वत:चा तर १० टक्के पालक व शिक्षकांचा वाटा असतो गुणवत्ता व दर्जा देत विद्यार्थी घडवत असताना बारामती चे शिक्षण क्षेत्रात नाव उज्जवल करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे  प्रा. ज्ञानेश्वर मुटकूळे यांनी सांगितले.यावेळी आचार्य अॅकॅडमीतील जेईई, नीट, एनडीए, एमएच सीईटी परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच दहावी, बारावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनाही सन्मानीत करण्यात आले. सूत्रसंचालन अनिल  सावळेपाटील यांनी केले .आचार्य अकॅडमी च्या नीट  फौंडेशन कोर्स मुळे फायदा होऊन नीट परीक्षेत ७२० पैकी ७१० मार्क मिळाल्याने देशातील कोणत्याही शासकीय वैदकीय महाविद्यालयात  प्रवेश मिळणार असल्याचे विक्रम निबाळकर व त्याच्या आई डॉ सौ प्राची निबाळकर यांनी मुलाखत मध्ये  सांगितले.


Back to top button
Don`t copy text!