स्थैर्य, भुईंज, दि. 11 : किसन वीर साखर कारखान्याचे संस्थापक, थोर स्वातंत्र्य सैनिक आबासाहेब तथा किसन वीर यांच्या 115 व्या जयंतीनिमित्त किसन वीर सातारा साखर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले आणि संचालक मंडळाच्या उपस्थितीत प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.
थोर स्वातंत्र्य सैनिक आबासाहेब तथा किसन वीर यांची जयंती दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरी केली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून यंदाचा किसन वीर सामाजिक पुरस्कार सांगोला येथील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री गणपतराव देशमुख तर पुणे येथील रूरल फौंडेशनचे प्रदिप लोखंडे यांना प्रेरणा पुरस्कार जाहिर करण्यात आलेला आहे. हे दोन्ही पुरस्कार दोन्ही पुरस्कारमुर्तींच्या निवासस्थानी जाऊन देण्यात येणार असल्याची माहीती मदनदादा भोसले यांनी यावेळी दिली.
यावेळी कारखान्याचे संचालक चंद्रकांत इंगवले, नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, मधुकर शिंदे, चंद्रसेन शिंदे, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.