दैनिक स्थैर्य । दि.१५ एप्रिल २०२२ । मुंबई । मुंबईतील भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रदेश प्रवक्ते अतुल शहा, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी व कार्यकर्त्यांनी पुष्पाजंली अर्पण केली.