राजधानीत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी


दैनिक स्थैर्य । दि.१३ जानेवारी २०२२ । नवी दिल्ली । राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय  केंद्रात साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त   डॉ. निरुपमा  डांगे  यांनी  राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद  यांची जयंती साजरी करण्यात  आली. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी  तथा  उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.


Back to top button
Don`t copy text!