दैनिक स्थैर्य | दि. १९ डिसेंबर २०२४ | फलटण |
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) – केंद्र फलटणचा वर्धापन दिन आणि शारदा पुरस्कार वितरण समारंभ शनिवार, दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित केला आहे. हा कार्यक्रम नवलबाई मंगल कार्यालय, मारवाड पेठ, फलटण येथे होणार असल्याची माहिती फलटण केंद्र प्रमुख व कार्यकारिणी सदस्य यांनी दिली आहे.
या कार्यक्रमात कै. सत्यभामाबाई वा. लेले यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा श्री शारदा पुरस्कार डॉ. सौ. प्रतिभा मनोहर जोशी, पुणे (शिक्षणतज्ज्ञ व व्यवस्थापन तज्ज्ञ) यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच फलटण केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त स्नेह मेळावा आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सौ. मृणालिनी शांताराम आवटे या असून प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. शिल्पा इनामदार या उपस्थित राहणार आहेत.