
स्थैर्य, सातारा, दि. 8 नोव्हेंबर : युनायटेड वेस्टर्न बँकेने बँकेचे संस्थापक कै. वा. ग. चिरमुले यांचे स्मरणार्थ स्थापन केलेल्या वा.ग.तथा अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्ट’ तर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात अमूल्य सेवा देणार्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. सन्मानचिन्ह व रु.एक लाख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.या वर्षी ट्रस्टने नाम फाउंडेशन या संस्थेस हा पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. नाम फाउंडेशन ही नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या मराठी सिनेअभिनेत्यांनी सामाजिक जाणिवेतून सुरू केलेली संस्था आहे.
या संस्थेची स्थापना सप्टेंबर 2015 मध्ये झाली. ही संस्था महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्तशेतकर्यांच्या कुटुंबीयांना मदत व त्यांना पुनः उभे राहाण्यास करते.मदतीचे स्वरूप फक्त आर्थिक मदत न रहाता, शेतकर्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना काही पर्यायी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे, यासाठीसुद्धा ही संस्था कार्यरत आहे. ही संस्था शेतकर्यांच्या समस्यांचे निर्मूलन करून त्यांना व त्यांच्या कुटुंबाला सशक्त बनवते.
वंचित गावांमध्ये विकास आणि अशा लोकांच्या जीवनात आनंद आणण्याच्या त्यांच्या 10 वर्षाच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सन2024 चा ‘चिरमुले पुरस्कार’ सदर संस्थेस देऊन गौरविण्याचे ठरविले आहे. चिरमुले ट्रस्टने यापूर्वी डॉ.कै.मनमोहन सिंग, डॉ.श्री.विजय भटकर,डॉ.अनिल काकोडकर, कै.रतन टाटा, कै.राहुल बजाज,डॉ.सी.रंगराजन,श्री.गुलजार,डॉ.सायरस पूनावाला,डॉ.राजेंद्रसिंह, डॉ. हिम्मतराव बावस्कर आदि आदरणीय व्यक्तिनाया पुरस्काराने गौरविले आहे.पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम लवकरच आयोजित केला जाईलअशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त दिलीप पाठक, डॉ.अनिल पाटील, डॉ.अच्युत गोडबोले, समीर जोशी यांनी दिली आहे.

