कोळकीत अण्णाभाऊ साठे जयंती साजरी


दैनिक स्थैर्य | दि. 01 ऑगस्ट 2024 | कोळकी | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह कोळकी येथे उपसरपंच डॉ. अशोक नाळे व विक्रम पखाले यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतीमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

या वेळी युवा नेते उदयसिंह निंबाळकर (बबलू भैय्या), दादा कोरडे, वरिष्ठ लिपिक दिलीप आवारे, मंगेश इंगळे, नितीन रीटे, संदीप नाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कोळकी मधील समाज बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन राजन खिलारे, प्रशांत खवळे, दादा उमापे, विजय कांबळे यांनी केले होते.


Back to top button
Don`t copy text!