दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२२ । फलटण । अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून उपेक्षितांच्या जगण्याचे वास्तव अधोरेखित केले असून ही पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती शोषित,पिढीत श्रमिक,कष्टकरी, उपेक्षितांच्या तळहातावर तरलेली आहे.’असे त्यांनी निक्षून सांगितले असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा पूर्व विभागाचे अध्यक्ष भीमराव घोरपडे यांनी केले. ते झिरपे गल्ली येथील समाज मंदीरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व अभिवादन करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या फलटण तालुका अध्यक्ष अश्विनी अहिवळे, फलटण शहर अध्यक्ष सपना भोसले, फलटण शहर उपाध्यक्ष मयुरी गायकवाड, अशोक भोसले,अरविंद आढाव, डि पी अहिवळे, जालिंदर झेंडे व इतर मान्यवर उपस्थित होते.