आदर्श तरुण मंडळच्या अनिता काळंगे ‘होम मिनिस्टर’

मुलगी वाचवा, पर्यावरण वाचवा अभियान राबवत महिलांचा सहभाग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २६ सप्टेंबर २०२३ | बारामती |
स्त्रीभ्रूण हत्या करू नका, मुलगी शिकवा व पर्यावरण वाढवा, प्लॅस्टिकचा वापर नको, चांद्रयान मोहीम आदी सामाजिक विषयांवर उखाणे आणि सामान्य ज्ञानावर आधारित व विविध मनोरंजन खेळावर आधारित अनिल सावळे-पाटील प्रस्तुत ‘होम मिनिस्टर खेळ रंगला वहिनीं’चा कार्यक्रमात परिसरातील महिलांनी भाग घेऊन विविध बक्षिसे जिंकली.

शिरषणे येथील आदर्श तरुण मंडळ यांनी गणेशोत्सवानिमित्त महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात केले होते. या प्रसंगी सरपंच मोनिका तुषार खुटवड व चंदूकाका सराफ अँड सन्सचे धनंजय माने, विनोद जगताप, सचिन जाधव, रणजित सावळे, प्रवीण काळे व विविध संस्थांचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

यामध्ये प्रथम विजेत्या अनिता अशोक काळंगे, द्वितीय ऋनिता अतुल चव्हाण, तृतीय शितल कृष्णात पवार यांना पैठणी व इतर बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत निवड झाल्याबद्दल संदीप रविराज खलाटे व विशाल दत्तात्रय लोखंडे आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सादरीकरण अनिल सावळे-पाटील यांनी केले. स्वागत अतुल चव्हाण व हेमंत पवार यांनी केले तर आभार विजय साळुंखे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!