दैनिक स्थैर्य | दि. 23 डिसेंबर 2024 | फलटण | महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण येथील चतुर्थ वर्षातील उद्यानदूतांनी जावली येथे पशु आरोग्य तपासणी व लसीकरण हा कार्यक्रम आयोजित केला होता.
तोंडामध्ये व पायामध्ये जखमा होऊ नये व दूध कमी होऊ नये यासाठी लसीकरण करण्यात आले. या लसीकरणांमध्ये फुटवैक या लसीचा वापर करण्यात आला यावेळी सर्व ग्रामस्थ शेतकरी व विद्यार्थी उपस्थित होते.
या लसीकरणादरम्यान डॉ. आश्विन साळुंखे पशुवैद्यकीय तज्ञ यांचे मोलाचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळाले. सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयचे उद्यानदूत शिंदे ओंकार, सुमंत अथर्व, गोफणे विशाल, समिंदर साहिल, ढेकळे करण, इप्पार किरण यांनी केले होते. तर त्यांना डॉ. एस. डी. निंबाळकर, डॉ. यु. डी. चव्हाण, प्रा. ए.डी. पाटील, डॉ. जे. व्ही. लेंभे यांच्यासह जावलीचे ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.