दैनिक स्थैर्य । दि. १० डिसेंबर २०२२ । बारामती । जिद्द चिकाटी व आत्मविश्वास जोरावर तुम्ही संघर्षमय परिस्थितीवर मात करून यश मिळवू शकता हे दाखवून दिलेले आहे बाल निरीक्षण गृह बारामती येथील अनिल जाधव यांनी बारामती निरीक्षण गृह, बालगृह या सस्थेचा माजी अनाथ प्रवेशित चि. अनिल माणिक जाधव याची सहाय्यक कक्ष अधिकारी (A.S.O) मंत्रालय, मुंबई पदी निवड झाली आहे.
निरीक्षण गृह, बालगृह, बारामती या संस्थेतील माजी अनाथ प्रवेशित चि. अनिल माणिक जाधव हा नुकत्याच झालेल्या राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षा सन २०२१-२०२२ परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहे. त्याची सहाय्यक कक्ष अधिकारी (A.S.O) मंत्रालय, मुंबई या पदी निवड झालेली आहे. त्यास महिला व बाल विकास विभाग, पुणे यांनी दिलेल्या अनाथ प्रमाणपत्राचा लाभ मिळालेला आहे. कौतुकास्पद कामगिरी करणारा अनिल अनाथ असुन गेली काही वर्ष MPSC चा अभ्यास करीत होता. महिला व बाल विकास विभागाकडुन मिळालेल्या अनाथ प्रमाणपत्राचा त्याला लाभ झाला तसेच त्याने या पदासाठी खुप मेहनत घेतली आहे. अनिल हा सन २००९ ते २०१३ पर्यंत निरीक्षण – गृह/बालगृहः बारामती जि.पुणे या संस्थेत निवासी राहुन शिक्षण घेत होता. त्याने संस्थेत असताना इ.१० वी नंतर आय. टी. आय. COE प्रशिक्षण व इ.१२ वी पर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. त्यानंतर त्याने कंपनीमध्ये काम करून MA पर्यंत महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले आहे. शिक्षण घेत असताना त्याने MPSC चा अभ्यास करण्यास सुरूवात केली होती. महिला व बाल विकास विभाग, पुणे तसेच संस्थेचे चेअरमन मा. श्री. सदाशिवराव (बापूजी) सातव सचिव मा. डॉ . श्री. अशोक तांबे व सर्व कार्यकारणी मंडळ प्रभारी अधिक्षक श्रीमती सुगंधा जगताप व इतर कर्मचारी वृंद यांचे मार्फत त्याचे कौतुक करण्यात आले अनिल जाधव हा संस्थेमधील प्रवेशित मुलांसाठी तसेच MPSC करणा-या मुलांसाठी प्रेरणास्थान बनलेला आहे ही संस्थेसाठी खुप अभिमानाची गोष्ट आहे.