विनयभंग प्रकरणी अनिल जाधव दोषी; १० हजारांचा दंड

दंड न दिलेस ३ महिने साधी कैद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २४ जानेवारी २०२५ | फलटण |
फलटण येथील अनिल ज्ञानेश्वर जाधव (वय २४, राहणार बुधवार पेठ, फलटण, तालुका फलटण, जिल्हा सातारा) यास फिर्यादी महिला व तिच्या मैत्रीणीचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवून १०,०००/- रुपये दंड व दंड न दिलेस ३ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

ही घटना १३ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११.४० वाजता हडको कॉलनी, फलटण येथे घडली होती. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी अनिल ज्ञानेश्वर जाधव याने फिर्यादी व फिर्यादीची मैत्रीण या हडको कॉलनी येथे जात असताना पाठीमागून मारुती कार (क्रमांक एमएच-१४-पी-५८३८)ने येऊन फिर्यादीचा पाठलाग करीत जवळ जात गाडीचा दरवाजा उघडला, त्यावेळी अनिल जाधव हा नग्न अवस्थेत होता. त्याने अश्लील कृती केली व फिर्यादी, फिर्यादीची मैत्रिणी यांचे लक्ष वेधून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

या प्रकरणी सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. पल्लवी खुस्पे, तपास अधिकारी म्हणून महिला पोलीस हवालदार अनिता पानसरे, पैरवीसाठी महिला पोलीस कॉन्स्टेबल संगीता नरळे यांनी काम पाहिले.


Back to top button
Don`t copy text!