वडजल देवस्थानला ‘क’ वर्ग दर्जा अनिल देसाई यांची माहिती : हजारो भाविकांमध्ये समाधान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.३०: हजारो भक्तांचे श्रद्धास्थान वडजल, ता. माण येथील वडजाई देवस्थानला अखेर ‘क’ वर्ग दर्जा मिळाला आहे. वडजल देवस्थानला ‘क’ वर्ग दर्जा मिळण्यासाठी कुकुडवाड गटाच्या जिल्हा परिषद सदस्या व जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ. सुवर्णाताई अरुण देसाई, जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, यांच्यासह ग्रामपंचायत वडजल, ग्रामस्थांच्या वतीने पाठपुरावा सुरू होता. त्यास अखेर यश आले आहे. वडजल देवस्थानच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील व ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिल्याची माहिती अनिल देसाई यांनी दिली आहे.

दरम्यान, वडजलकरांना निवडणुकीवेळी दिलेल्या आश्‍वासनाची शब्दपूर्ती केल्याचे समाधान वाटत असल्याचेही यावेळी देसाई यांनी नमूद केले.वडजल येथील वडजाई ही हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. तथापि, निधीअभावी या देवस्थानचा विकास रखडला होता. त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता. शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आले होते. वेळावेळी निवेदने, आंदोलन याद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले होते. अखेर या पाठपुराव्यास यश मिळाले असून, ‘क’ वर्ग दर्जा मिळाला आहे.‘क’ वर्ग देवस्थानचा दर्जा मिळाल्यामुळे वडजलचा सर्वांगीण विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, भाविकांना योग्य सुविधा चांगल्या रितीने देता येणार आहेत. वडजलकरांना निवडणुकीवेळी दिलेल्या आश्‍वासनाची शब्दपूर्ती केल्याचे समाधान वाटत असल्याचे अनिल देसाई यांनी सांगितले. तसेच याकामी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचेही सहकार्य लाभल्याचेही देसाई यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!