आपच्या तालुका कोषाध्यक्ष पदी अनिकेत नाळे


दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२२ । फलटण । आम आदमी पार्टीच्या फलटण तालुका कोषाध्यक्ष पदी अनिकेत नाळे यांची निवड करण्यात आली आहे. त्याबाबतचे नियुक्ती पत्र आपचे तालुकाध्यक्ष धैर्यशील लोखंडे यांनी नाळे यांच्याकडे सुपूर्द केले.

अनिकेत नाळे हे भष्टाचार विरोधी जन आक्रोश आंदोलनचे सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. अनिकेत नाळे यांना या पुर्वी विविध सामाजिक क्षेत्रामध्ये कामकाजाचा अनुभव आहे.

या वेळी आपचे फलटण तालुका अध्यक्ष धैर्यशील अंकुशराव लोखंडे, उपाध्यक्ष समाधान राऊत, राहुल भोईटे, सचिव प्रताप चव्हाण, तालुका संघटक वीरसेन सोनवणे तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक पांडुरंग अहिवळे व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!