
दैनिक स्थैर्य । दि. १७ मार्च २०२२ । फलटण । तालुक्यातील भाडळी बु.।। गावचे सुपुत्र चि. अनिकेत शेंडे यांनी सुरू केलेल्या “अनिकेत डिजीटल स्टुडीओ” च्या माध्यमातून ग्राहकांना उत्तम व दर्जेदार सेवा मिळेल. या सोबतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण करेल, असा विश्वास सिनेअभिनेते धोंडीबा कारंडे यांनी व्यक्त केला.
चि. अनिकेत शेंडे यांनी झिरपवाडी गावामध्ये फलटण – दहीवडी रस्त्यालगत नव्याने सुरू केलेल्या व्यवसायाच्या उद्घाटन प्रसंगी कारंडे बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणवरे, झिरपवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच एम. एस. गुंजवटे, मातोश्री विविध कार्यकारी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव डांगे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास काशिनाथ मुळीक, बाळासाहेब शिंदे यांच्यासह आजी व माजी पदाधिकारी, शेंडे कुटुंबीय तसेच भाडळी बु.।।, भाडळी खु.।।, झिरपवाडी, सोनवडी, कोळकी येथील नागरिकांची उपस्थिती होती.
भाडळीचे माजी सरपंच श्रीरंग शेंडे यांनी स्वागत केले तर सूत्रसंचालन ह. भ. प. स्वप्नील महाराज शेंडे यांनी केले व आभार अनिकेत शेंडे यांनी मानले.