दैनिक स्थैर्य | दि. 18 डिसेंबर 2024 | फलटण | देशाचे माजी कृषी मंत्री तथा राज्यसभा खासदार शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली आहे. शरद पवारांच्या सोबत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा भेट घेतली असल्याची माहिती ANI ने ट्विट करत माहिती दिली आहे.
NCP-SCP chief Sharad Pawar, accompanied by pomegranate farmers from Satara and Faltan, met with Vice President and Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankhar today and presented him with pomegranates.
(Pics: Office of NCP-SCP MP Supriya Sule) pic.twitter.com/7B1haa2f2o
— ANI (@ANI) December 18, 2024
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना जी डाळिंब भेट दिली आहेत ती फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांची डाळिंब असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्र शाशनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली होती; सोबत शेतकरी प्रतिनिधी म्हणून जाताना फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना शरद पवारांनी सोबत नेहले आहे.
राज्यामधील फळांचे गाव म्हणून धुमाळवाडी गावाची घोषणा करण्यात आली होती. धुमाळवाडीसह तालुक्यातील बहुतांश ठिकाणी डाळिंबाचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी हे फळ उद्पादक शेतकरीच जाणू शकतात व त्या मांडू शकतात म्हणूनच शरद पवार यांनी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांची भेट हि पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासमवेत करून दिली असल्याचे सुद्धा समजत आहे.