उद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी; धमण्यांमध्ये ब्लॉकेजेस आढळले


दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑक्टोबर २०२४ | मुंबई |
उद्धव ठाकरे सोमवारी सकाळी ८ वाजता एचएन रिलायन्स रुग्णालयात चेकअपसाठी दाखल झाले होते. हृदयामधील हार्ट ब्लॉकेजची तपासणी झाल्यानंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सध्या डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी बारा वाजताच्या सुमारास अँजिओप्लास्टी करण्यात आली.

उद्धव ठाकरे यांना मागील दोन-तीन दिवसांपासून त्रास जाणवू लागल्याने सोमवारी सकाळी मुंबइतील रिलायन्स हरिकिसन दास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केली असता हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या वाहिन्यांमध्ये ब्लॉकेजस आढळून आहे. त्यानंतर ठाकरेंवर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्धव ठाकरे सध्या रुग्णालयात भरती असून डॉक्टरांची टीम त्यांची काळजी घेत आहे. ठाकरेंची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.

ठाकरेंवर १२ वर्षांनी अँजिओप्लास्टी

यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर २०१२ मध्ये अँजिओप्लास्टी झाली होती. त्यानंतर आता १२ वर्षांनंतर त्यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!