दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२१ । फलटण । आगोदर झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन एका बांधकाम व्यावसायिकावर चाकू हल्ला करुन गजाने मारहाण केल्याप्रकरणी फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक पांडूरंग गुंजवटे यांच्यासह अभिजित जानकर या दोघांवर फलटण शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत फलटण शहर पोलिस स्टेशनमधून मिळालेली माहिती अशी की, सागर सुधीर शहा, वय ३६, रा. गोळीबार मैदान, फलटण हे बांधकाम व्यावसायिक आहेत. गुरुवार ता. २ रोजी दुपारी दोनच्या सुमारास सागर शहा हे फलटण नगरपरिषदेच्या पार्किंग गेटसमोर गाडी लावून चालले होते. त्यावेळी अभिजित जानकर रा. शुक्रवार पेठ, फलटण व नगरसेवक पांडूरंग गुंजवटे रा. मलठण, फलटण यांनी आगोदर झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन सागर शहा यांच्या हाताच्या दंडावर अभिजित जानकर चाकू सारख्या हत्याराने वार केला. पांडूरंग गुंजवटे यांनी लोखंडी गजाने डोक्यात मारहाण केली तसेच शहा यांना गुजरांनो तुम्हाला मस्ती आली आहे असे म्हणत शिवीगाळ केली. सदर मारहाणीत सागर शहा जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अभिजित जानकर व नगरसेवक पांडूरंग गुंजवटे यांच्याविरुध्द गुन्हा फलटण शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पुढिल तपास पोलिस उपनिरीक्षक कदम करीत आहेत.