एंजल वनची स्मार्ट रिपब्लिक मोहीम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२२ । मुंबई । फिनटेक कंपनी एंजल वन लिमिटेडने अद्वितीय आऊटरिच धोरण – स्मार्ट रिपब्लिक मोहीम लॉन्च केली आहे. स्मार्ट रिपब्लिक हा तंत्रज्ञान सक्षम एंजल वन उत्‍पादने व सेवांचा लाभ घेतलेल्या १ कोटीहून अधिक एंजन वन युजर्सचा समुदाय आहे. कंपनीचे ग्राहक ब्रॅण्‍ड अॅम्बेसेडर्स बनले आहेत आणि देशभरातील जनरेशन झेड व मिलेनियल्सना एंजल वनसह स्मार्ट गुंतवणूका करण्यास प्रोत्साहित करत आहेत.

डिजिटल-केंद्रित ब्रॅण्ड असलेल्या एंजल वनने सोशल मीडिया व्यासपीठ, ओटीटी आणि इतर प्रमुख डिजिटल व्यासपीठांवर द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील जनरेशन झेड व मिलेनियल्सना लक्ष्य करणारी मोहीम लाँच केली. कंपनी तरूण गुंतवणूकदारांना एंजल वनसह स्मार्ट गुंतवणूकांची निवड करण्यास आणि १ कोटीहून अधिक ग्राहकवर्गाच्या प्रबळ समुदायाचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करू इच्छिते.

एंजल वनने या मोहिमेअंतर्गत तीन डिजिटल जाहिराती प्रदर्शित केल्या, ज्या फिनटेक व्यासपीठ वापरण्याच्या तीन फायद्यांवर लक्ष केंद्रित करतात – जलद खाते उघडणे, स्मार्ट शिफारशी आणि कॅश डिलिव्हरीसाठी ० (शून्य) रूपये व इतर विभागांसाठी प्रतिऑर्डर २० रूपये ब्रोकरेज. ही मोहिम जनरेशन झेड व मिलेनियल्सच्या गरजांना दाखवते, ज्यांना जलद, स्मार्टर व किफायतशीर सोल्यूशन्सची पाहिजेत आणि हे सर्व सोल्यूशन्स एंजन वनवर उपलब्ध आहेत.

एंजल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री. प्रभाकर तिवारी म्हणाले, “सक्षम व्यासपीठ म्हणून एंजल वनमध्ये विश्वास असलेले एंजन वनचे स्मार्ट रिपब्लिक या मोहिमेअंतर्गत कंपनीसाठी समर्थक म्हणून कार्य करत आहेत. आमचा दृढ विश्वास आहे की, एंजल वनचा वारसा आणि तंत्रज्ञान लाभांसह आमचे व्यासपीठ स्मार्ट गुंतवणूकीचे लोकशाहीकरण करण्यास उत्तमरित्‍या सुसज्ज आहे. ही मोहिम आम्हाला हे ध्येय संपादित करण्यामध्ये सक्षम करेल.”

एंजल वन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गंगाधर म्हणाले, “एंजल वनमध्ये आम्ही युजर-अनुकूल उत्पादने व सोल्यूशन्स निर्माण करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानांचा समावेश केला आहे. ग्राहक आपल्या उत्पादनांचा प्रचार करणे हे ब्रॅण्डसाठी सन्माननीय आहे. अधिक पुढे जात आम्ही अधिकाधिक तंत्रज्ञान-केंद्रित सोल्यूशन्स वितरित करणे सुरूच ठेवू, जे गुंतवणूक व संपत्ती निर्मिती सुलभ करतील. आमचा हे तंत्रज्ञान व सोल्यूशन्सना देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत घेऊन जाण्याचा आणि देशाच्या कानाकोप-यामधील भारतीयांसाठी संपत्ती निर्मिती वास्तविक बनवण्याचा मनसुबा आहे.”


Back to top button
Don`t copy text!