दैनिक स्थैर्य । दि.२२ नोव्हेंबर २०२१ । मुंबई । एंजेल वन लिमिटेड (पूर्वीचे नाव एंजेल ब्रोकिंग लिमिटेड) या फिनटेक प्लॅटफॉर्मने, नवीन युगातील गुंतवणूकदारांना स्मार्ट सोल्युशन्सचा वापर करून भांडवल बाजारातील तेजीच्या लाटेवर स्वार होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, स्मार्ट सौदा २.० हे नवीन अभियान सुरू केले आहे. हे अभियान सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, ओटीटी, बिझनेस चॅनल्स, डिस्प्ले प्लॅटफॉर्म्स, ऑडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स आदी माध्यमांद्वारे राबवले जात आहे. या अभियानाचा भाग म्हणून, एंजेल वनने श्रेणी-२, श्रेणी-३ आणि त्या पलीकडील शहरांमधील नवीन पिढीतील गुंतवणूकदारांना लक्ष्यस्थानी ठेवून तीन टीव्हीसी प्रदर्शित केल्या आहेत. एंजेल वन, नवीन युगातील स्मार्ट गुंतवणूकदाराला गुंतवणूकविषयक गरजांसाठी ‘व्हेरी स्मार्ट’ सोल्युशन्स पुरवून अधिक सक्षम कसा करतो, हे टीव्हीसींमध्ये अधोरेखित करण्यात आले आहे.
एंजेल वन लिमिटेडचे चीथ ग्रोथ ऑफिसर प्रभाकर तिवारी म्हणाले, “आमच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व मशिन लर्निंगवर आधारित प्रगत सोल्युशन्सच्या माध्यमातून, नवीन युगातील गुंतवणूकदारांना त्यांचा गुंतवणुकीचा प्रवास सुलभ करण्यात, मदत पुरवणे हे एंजेल वनमध्ये आमचे उद्दिष्ट आहे. आमचे नवीन अभियान नवीन भारतीय गुंतवणूकदाराचा सन्मान करते. हा गुंतवणूकदार त्याचे हित कशात आहे याबद्दल जागरूक आहे. नवीन पिढीला तंत्रज्ञानाची माहिती आहे आणि अनेकविध कामे पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग कसा करायचा याचेही ज्ञान आहे. आमचे अभियान ‘स्मार्ट सौदा २.०’ स्मार्ट गुंतवणूकदारांना, त्यांच्या पैशाचे व्यवस्थापन चातुर्याने करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या गुंतवणुकीच्या साधनांची ओळख करून देते.”
एंजेल वन लिमिटेडचे सीईओ नारायण गंगाधर म्हणाले, “स्मार्ट गुंतवणूकदार एंजेल वनच्या साथीने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करून त्यांची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करू शकतात यावर आम्हाला स्मार्ट सौदा २.० या अभियानाच्या माध्यमातून प्रकाश टाकायचा आहे. एआरक्यू प्राइममार्फत आम्ही करत असलेल्या चतुर शिफारशी आणि स्मार्ट मनीसारखी अन्य डिजिटल साधने, नवीन युगातील गुंतवणूकदारांना, माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय करण्यासाठी उपयुक्त ठरतील. त्याचप्रमाणे आमचे शून्य ब्रोकरेज शुल्काचे तत्त्व स्टॉक्समधील गुंतवणुकींचा पर्याय दीर्घकालीन वाढीचा मार्ग म्हणून स्वीकारण्यास उत्तेजन देते.”
झटपट खाते उघडणे तसेच इक्विटी डिलिव्हरीसाठी झिरो चार्ज आणि इंट्राडे, फ्यचर्स अँड ऑप्शन्स व करन्सी अँड कमोडिटीसाठी २० रुपयांतील ऑर्डर आदी आयट्रेड प्राइम प्लान्सशिवाय, एंजेल वन, सर्व असेट वर्गांमध्ये सुलभ गुंतवणुकीसाठी वेब आणि मोबाइलवरील तंत्रज्ञानाधारित स्मार्ट प्लॅटफॉर्म्स देऊ करते. कंपनीचा स्मार्टएपीआय प्लॅटफॉर्म सर्व क्लाएंट्स, स्टार्टअप्स आणि पार्टनर्स यांच्यासाठी उपलब्ध आहे. ते त्यांची धोरणे, वेबसाइट्स, अॅप्स आणि अनेकविध प्लॅटफॉर्म्स यांचे, एंजेल वनच्या ट्रेडिंग प्रणालींसोबत, थेट एकात्मीकरण करू शकतात. क्लाएंट्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने नवोन्मेषाचा पाठपुरावा केला पाहिजे, असे या फिनटेक कंपनीला वाटते.