दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२१ | मुंबई | अत्याधुनिक ट्रेडिंग आणि गुंतवणुकीच्या सेवा पुरवण्यासाठी कटिबद्ध एंजल वन ट्रेडिंग लिमिटेडने (पूर्वाश्रमीची एंजल ब्रोकिंग लिमिटेड) आपल्या मोबाइल अॅप्लिकेशनमध्ये इन्स्टा ट्रेड हे एक नवे फीचर आणले आहे. नवशिका असो की अनुभवी ट्रेडर, आपल्या सुलभ इंटरफेसच्या माध्यमातून हे नवे टूल सर्वांसाठी ट्रेडिंगचा पर्याय अगदी सोपा करून टाकते.
इन्स्टा ट्रेड हे फीचर वापरायला अतिशय सोपे तर आहेच, सोबत एंजल वन अॅप हे सूचकांक व शेअर्सच्या इंट्रा डे किमतींसह त्यांची चालही दाखवते. युजर्सना सहजपणे आपल्या वॉचलिस्ट्स, पोझिशन्स, लाइव्ह नफा-तोटा (पीअँडएल) हे पाहता येतील. त्यांच्यासोबतच आठवडाभरापूर्वीचे, ५ आठवड्यांपूर्वीचे, महिन्यांपूर्वीचे इतकेच नव्हे वर्षांपूर्वीचेही ऐतिहासिक तक्ते पाहता येतील. इन्स्टा ट्रेड एकाच स्क्रीनवर सर्वच अत्यावश्यक चार्ट्स, स्ट्राइक्स, सूचकांक, पीएँडएल आणि ऑर्ड्र्स दाखवतो. यामुळे युजर्सना वापरात सहजता येते. बाजारातील चढ-उतारांतून मार्ग काढण्यासाठी मदतीची गरज असलेल्या, विशेषकरून नव्या ट्रेडर्ससाठी हे खरोखरीच योग्य टूल आहे.
एंजल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर, प्रभाकर तिवारी म्हणाले की, सर्वकाही सुविधाजनक आणि सोपे असावे, ही नव्या पिढीच्या गुंतवणुकदारांची गरज आम्ही जाणतो. आमचे नवे फीचर इन्स्टा ट्रेड स्मार्टफोनवर फक्त एका क्लिकसरशी तुम्हाला ऑप्शन ट्रेड करण्यात सक्षम बनवते. नव्या पिढीत ऑप्शन ट्रेडिंग अतिशय लोकप्रिय होत आहे. कारण त्यात विद्युतगतीने निर्णय घेण्याची गरज असते.
एंजल वन लिमिटेडचे सीईओ नारायण गंगाधर म्हणाले की, सहजपणे ट्रेडिंग करता यावे म्हणून आम्ही नव्या पिढीची मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. गेल्या काही वर्षांत एंजल वनच्या (पूर्वाश्रमीची एंजल ब्रोकिंग) व्यावसायिक प्रारूपात अनेक बदल केले, जेणेकरून ते जनरेशन झेड व मिलेनिअल्सना गरजांनुरूप पूर्णपणे उतरेल. आता आमच्या नव्या इन्स्टा ट्रेडच्या माध्यमातून आम्ही सर्व युजर्सना ऑप्शन्स ट्रेडिंग अगदी काही सुलभ टप्प्यांत करता यावे, याचे उद्दिष्ट बाळगले आहे. यासोबतच हे टूल त्यांना बाजारातील चढ-उतारांबाबतही सावध करेल. यामुळे त्यांना विचारपूर्वक योग्य निर्णय घेण्यात मदत होईल.