एंजल वनची ग्राहक संख्या १२.५१ दशलक्षांवर पोहोचली


दैनिक स्थैर्य । दि. ०७ जानेवारी २०२३ । मुंबई । फिनटेक कंपनी एंजल वन लिमिटेडने डिसेंबर २०२२ मध्ये लक्षणीय वाढीची नोंद केली, जेथे त्यांची ग्राहक संख्या वार्षिक ६०.७ टक्क्यांच्या वाढीसह १२.५१ दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे, ज्यामध्ये एकूण ग्राहक संपादन ०.३३ दशलक्ष आहे.

कंपनीने डिसेंबर २०२२ मध्ये व्यवसाय घटकांमध्ये उत्तम कामगिरी केली. कंपनीचा रिटेल इक्विटी टर्नओव्हर मार्केट शेअर वार्षिक २१.८ टक्क्याच्या वाढीसह ९६ बीपीएसपर्यंत वाढला. तसेच एकूण सरासरी दैनिक उलाढाल वार्षिक १३३.३ टक्क्यांच्या लक्षणीय वाढीसह १६.४० ट्रिलियन रूपयांपर्यंत पोहोचली. ऑर्डर्सची संख्या वार्षिक ३३.५ टक्क्यांच्या वाढीसह ८६.२३ दशलक्षांपर्यंत वाढली. सरासरी ग्राहक फंडिंग बुक १३.७५ बिलियन रूपये राहिले.

एंजल वन लि.चे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री. प्रभाकर तिवारी म्हणाले, ‘‘वाढती ग्राहक संख्या आणि मार्केट शेअरसह आम्ही निश्चितच वर्ष २०२२ सांगता उत्साहवर्धक केली आहे. पुढील वर्षासाठी आमचा नवीन टप्पे व मोठी उंची गाठण्याचा दृष्टिकोन आहे. एंजल वन येथे अवलंबण्यात आलेल्या विपणन व तंत्रज्ञान केंद्रित धोरणांचे संयोजन सतत व्यवसाय विस्तारीकरणाची सुविधा देत आहे.’’

एंजल वन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गंगाधर म्हणाले, ‘‘एंजल वनचे तंत्रज्ञान-सक्षम विकास धोरण व्यवसायासाठी लाभदायी ठरत आहे. आम्ही अधिक प्रवेश न केलेल्या बाजारपेठांमध्ये सखोल प्रवेश करण्यास आणि अधिकाधिक व्यक्तींना अनुकूल व वापरण्यास सुलभ गुंतवणूक सोल्यूशन्स देण्यास उत्सुक आहोत. एंजल वन युजर अनुभव वाढवण्याप्रती आणि भारतीय भांडवल बाजारपेठेत मोठी वाढ करण्यासाठी नवीन व प्रगत तंत्रज्ञानांचा समावेश करण्याप्रती आपले प्रयत्न सुरूच ठेवेल.’’


Back to top button
Don`t copy text!