दैनिक स्थैर्य । दि. १० ऑक्टोबर २०२२ । मुंबई । फिनटेक कंपनी एंजल वन लिमिटेडने (पूर्वीचे नाव एंजल ब्रोकिंग लिमिटेड) सप्टेंबर २०२२ मध्ये आपल्या क्लाएंट्समध्ये आणखी ०.३९ दशलक्षांची भर घातली आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत ७७.४ टक्के वाढीसह कंपनीची क्लाएंट संख्या ११.५७ दशलक्ष झाली आहे. कंपनीची सरासरी दैनंदिन उलाढाल, मागील वर्षाच्या तुलनेत ११६.४ टक्के वाढीसह १३.७४ ट्रिलियन रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
एंजल वनने दमदार व्यावसायिक कामगिरी कायम राखत सप्टेंबर २०२२ मध्ये ९०.५४ दशलक्ष ऑर्डर्सची नोंद केली, मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ ६५.८ टक्के आहे. एकंदर रिटेल इक्विटी उलाढालीतील कंपनीचा वाटा मागील वर्षाच्या तुलनेत १३३ बीपीएसने वाढून २१.६ टक्क्यांवर पोहोचला आहे आणि सरासरी क्लाएंट फंडिंग बुक गेल्या वर्षीच्या तुलनेत ९.३ टक्के वाढून १५.३९ अब्जांवर गेले आहे.
एंजल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री. प्रभाकर तिवारी म्हणाले, “एंजल वन योग्य मार्गावर आहे आणि मोठ्या शहरांपलीकडे जाऊन श्रेणी २, ३ शहरांतील संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य धोरण अवलंबत आहे हे आमच्या सातत्याने वाढणाऱ्या क्लाएंट संख्येतून दिसून येत आहे. संपदासंचयाच्या घोडदौडीत सहभागी होण्यास अधिकाधिक लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहण्यास एंजल वन बांधील आहे. आम्ही भारतभरातील लोकांना आमच्या डिजिटल साधनांच्या माध्यमातून भांडवल बाजारात प्रवेशाची संधी देतो तसेच गुंतवणूकविषयक योग्य निर्णय करण्यात सहाय्य पुरवतो.”
एंजल वन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गंगाधर म्हणाले, “आमच्यासारख्या डिजिटल कंपन्यांनी भारतातील रिटेल सहभाग वाढवला आहे हे अगदी स्पष्ट आहे. आपल्या क्लाएंट्ससाठी अधिक दमदार डिजिटल परिसंस्था उभारण्याच्या दिशेने एंजल वन सातत्याने प्रगती करत आहे हे सर्वांना सांगताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या संरक्षित व सुरळीत सुपर अॅपच्या माध्यमातून संपदासंचयाचा आजवर घेतला नसेल असा अनुभव क्लाएंट्सना देण्याचे लक्ष्य आमच्यापुढे आहे. आम्ही यापुढेही सातत्याने प्रगत तंत्रज्ञानांचा शोध घेत राहू आणि त्यांचा आमच्या प्रणालींमध्ये समावेशही करू.”