एंजल वनच्या ग्राहक संख्येत वार्षिक ९६.९ टक्क्यांची वाढ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ जुलै २०२२ । मुंबई ।  फिनटेक कंपनी एंजल वन लिमिटेडने जून २०२२साठी त्यांच्या व्यवसायामध्ये झालेल्या वाढीच्या आकडेवारींची घोषणा केली, ज्यामधून आणखी एका प्रभावी महिन्याची नोंद झाली. कंपनीने आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये १०.४१ दशलक्ष ग्राहक संपादित केले, ज्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ९६.९ टक्क्यांची वाढ झाली. जून २०२२ मध्ये ०.३४ दशलक्ष ग्राहकांची भर आणि तिमाहीमध्ये १.२६ दशलक्ष ग्राहकांची भर सह व्यवसाय घटकांमध्ये वाढ झाली आहे.

एंजल वनने जून २०२२ मध्ये वार्षिक ४२.६ टक्क्यांच्या वाढीसह ७०.१५ दशलक्ष ऑर्डर्सची प्रक्रिया केली. जून २०२२ मध्ये फिनटेक कंपनीचा अॅव्हरेज डेअरी टर्नओव्हर (एडीटीओ) वार्षिक ११८.५ टक्यांच्या वाढीसह ९.७६ ट्रिलियन रूपयांपर्यंत पोहोचला. जून २०२२ मध्ये कंपनीचे सरासरी क्लायण्ट फंडिंग बुक वार्षिक १९.८ टक्क्यांच्या वाढीसह १६.३१ बिलियन रूपयांपर्यंत पोहोचले.

एंजल वन लि.चे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री. प्रभाकर तिवारी म्हणाले, “आमच्या वाढत्या आकडेवारींमधून सिद्ध होते की, सध्या अस्थिर वातावरण असताना देखील लोकांची भांडवल बाजारपेठांमधील रूची वाढत आहे. आम्ही या तिमाहीमध्ये प्रचंड यश संपादित केले, जेथे आमच्या ग्राहकवर्गाने १० दशलक्षचा टप्पा पार केला. आमच्या सुपर अॅपच्या लाँचसह आम्ही आमच्या ग्राहकांना प्रगत संपत्ती निर्मितीचा अनुभव देण्यास उत्सुक आहोत.”

एंजल वन लि.चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गंगाधर म्हणाले, “आमच्या ग्राहकवर्गामध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीमधून आमच्यावर ग्राहकांचा असलेला विश्वास दिसून येतो. यामुळे आम्हाला एंजल वनला संपत्ती निर्मितीसाठी सर्वोत्तम फिनटेक व्यासपीठ बनवण्याप्रती काम करत राहण्यास चालना मिळते. एंजन वन आणि त्यांच्या मौल्यवान ग्राहकवर्गामधील हा सहयोग दीर्घकाळापर्यंत राहो अशी आमची इच्छा आहे. एंजल वन व्यापक ग्राहकवर्गाच्या गरजांची पूर्तता करण्यास सज्ज आहे आणि आमची बाजारपेठ नेतृत्वाचे ध्येय संपादित करण्याची महत्त्वाकांक्षा आहे.”

एंजल वन भारतातील संपत्ती निर्मितीला पुनर्परिभाषित करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. कंपनी वंचित द्वितीय व तृतीय श्रेणीच्या आणि त्यापलीकडील शहरांसह देशाच्या कानाकोप-यामधील लोकांना उपलब्ध होतील अशी प्रबळ गुंतवणूक साधने निर्माण करत आहे.


Back to top button
Don`t copy text!