दैनिक स्थैर्य । दि. १५ डिसेंबर २०२१ । मुंबई । फिनटेक प्लॅटफॉर्म एंजेल वन लिमिटेडने (पूर्वीचे नाव एंजेल ब्रोकिंग लिमिटेड) नोव्हेंबर २०२१ मध्ये दमदार वाढ साध्य केली आहे. कंपनीच्या ग्राहकवर्गात मागील वर्षाच्या तुलनेत १४६.२ टक्के वाढ होऊन तो ७.३२ दशलक्षांपर्यंत विस्तारला आहे. कंपनीच्या एकूण ग्राहक संपादनामध्ये ०.४५ दशलक्षांनी अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत १९३.० टक्के वाढ झाली. एंजेल वनने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत ग्राहक संख्येत ३.४ दशलक्षांची भर घातली आहे.
एआरक्यू प्राइम, स्मार्ट मनी, इन्स्टा ट्रेड आदी आपल्या अत्याधुनिक उत्पादन व सेवांच्या श्रेणीमुळे फिनटेक प्लॅटफॉर्मने दमदार वाढदर कायम ठेवला आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये एंजेलने, जेनझेड आणि मिलेनिअल्सना भांडवली बाजाराच्या घोडदौडीकडे आकर्षित करून घेण्यासाठी, स्मार्ट सौदा २.० आणि शगुन के शेअर्स, ही अभियाने सुरू केली. प्लॅटफॉर्मद्वारे दिल्या जाणाऱ्या स्मार्ट सोल्युशन्सबद्दल जागरूकता निर्माण करणे हे या अभियानांचे लक्ष्य आहे.
कंपनीने व्यवसायाच्या सर्वच मापदंडांवर दमदार वाढ साध्य केली. नोव्हेंबर २०२१ मध्ये कंपनीची सरासरी दैनंदिन उलाढाल (एडीटीओ) मागील वर्षाच्या तुलनेत २१९.३ टक्क्यांनी वाढून ७,२१७ अब्ज रुपयांवर पोहोचली. याच महिन्यात अॅव्हरेज क्लाएंट फंडिंग बूकमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत १९०.९ टक्के वाढ होऊन ते १५.४९ अब्ज रुपयांवर गेले, तर ऑर्डर्सची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत ११७.५ टक्के वाढून ५७.२२ दशलक्ष झाली.
एंजेल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर प्रभाकर तिवारी, “गेल्या काही महिन्यात ग्राहक संपादनात आम्ही सातत्याने वाढ करत आहोत, याचा आम्हाला आनंद वाटतो. याचा अर्थ आम्ही नवीन युगातील गुंतवणूकदारांना योग्य तो प्लॅटफॉर्म आणि सोल्युशन्स देऊ करत आहोत. देशभरातील गुंतवणूकदारांना अखंडित अनुभव सातत्याने देत राहण्याचे उद्दिष्ट आमच्यापुढे आहे. आमच्या नोव्हेंबर महिन्यातील दोन्ही अभियाने यशस्वी ठरली आहेत, असे व्यवसायातील वाढीच्या आकड्यांवरून दिसत आहे.”
एंजेल वन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण गंगाधर म्हणाले, “एंजेल वनमध्ये आम्ही आमच्या उत्पादनांमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंग यांसारख्या तंत्रज्ञानांचे एकात्मीकरण केले आहे. नवोन्मेष आणि तंत्रज्ञान यांच्या जोरावर आमची कंपनी महिन्यागणिक उत्तम निष्पत्ती साध्य करत आहे. नवीन प्रदेशांमध्ये विस्तार करण्यासाठी तसेच अधिकाधिक वापरकर्त्यांपर्यंत गुंतवणुकीचे लाभ पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”