अर्थसंकल्प सुलभपणे समजावण्यासाठी एंजल वनची मोहीम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०३ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तांत्रिक बाबी सामान्य व्यक्तीला समजण्यासाठी कठीण असतात. हीच बाब लक्षात घेत फिनटेक कंपनी एंजल वनने बहुतांश जनरेशन झेड व मिलेनियल्स असलेल्या गुंतवणूकदारांना केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ सुलभपणे स्पष्ट करण्यासाठी ‘बजेट का मतलब’ #BudgetKaMatlab मोहिम सुरू केली आहे. ही मोहिम अर्थसंकल्पाच्या प्रमुख पैलूंना स्पष्ट करत गुंतवणूकदारांसाठी नवीन संधी ओळखण्यावर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित करते.

प्री-बजेट, बजेट व पोस्‍ट-बजेट अशा तीन भागांमध्ये विभागणी करण्यात आलेल्या #बजेटकामतलब मोहिमेमध्ये वापरण्यास सुलभ अशा कन्टेन्टसह बजेट पिक्स, विभाग विश्लेषण, सोशल मीडिया अपडेट्स, वायटी व्हिडिओज अशा बाबींचा समावेश आहे. प्री-बजेट मोहिमेमध्ये इन्स्टाग्रामधील #आस्कमीएनिथिंग पोस्ट, पोल्स, प्री-बजेट विश्लेषणासंदर्भात (टेक्विकल + मूलभूल विश्लेषण) प्रभावकांसह सहयोगात्मक व्हिडिओज या उपक्रमांचा समावेश आहे. मुख्य बजेट मोहिमेमध्ये लाइव्‍ह अपडेट्स, सोशल मीडिया व्यासपीठांवरील आकडेवारी व कॅरोसेल पोस्ट्स आणि केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ चे लाइव्ह स्ट्रिमिंग यांचा समावेश आहे. आर्थिक प्रभावकांद्वारे पोस्ट-बजेट व्हिडिओ देखील सादर केला जाईल, जो अर्थसंकल्पाचे सविस्तर स्पष्टीकरण करेल. आणखी एक व्हिडिओ ‘इन्व्हेस्टिंग आयडीयाज सिरीज’अंतर्गत रीलीज करण्यात येईल, ज्यामध्ये अर्थसंकल्प २०२२ नंतर कोणत्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करावी यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल.

एंजल वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गंगाधर म्‍हणाले, “एंजल वनचा स्मार्ट मनी सारख्या आपल्या विविध व्यासपीठांच्या माध्यमातून रिटेल गुंतवणूकदारांना मालमत्ता निर्मितीच्या प्रत्येक पैलूबाबत माहिती देण्यावर विश्‍वास आहे. सामान्य व्यक्तींना केंद्रीय अर्थसंकल्प समजणे अवघड जाते ही बाब लक्षात घेत आम्‍ही #बजेटकामतलब मोहिम सुरू केली आहे. सोशल मीडिया व्यासपीठांवर सादर केल्या जाणा-या विविध प्रकारच्या कन्टेन्टसह व्हिडिओज युजर्सना अर्थसंकल्प सुलभपणे समजण्यामध्ये साह्य करतील. आम्ही रिटेल गुंतवणूकदारांना माहितीसह सक्षम करत आहोत, ज्यामुळे त्‍यांना शेअर बाजारामध्ये योग्य निर्णय घेण्यास मदत होईल.”

एंजल वनचे मुख्य विकास अधिकारी श्री. प्रभाकर तिवारी म्‍हणाले, “आमच्या मोहिमेचा गुंतवणूकदारांना अर्थसंकल्पाचे त्यांच्यावर झालेले परिणाम सुलभपणे समजावण्याचा आणि त्यामध्ये त्यांच्यासाठी असलेल्या संधी ओळखण्यामध्ये मदत करण्याचा मनसुबा आहे.”


Back to top button
Don`t copy text!