व्यवसायाच्या सर्व निकषांवर एंजल वनची उत्तम वाढ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १० ऑगस्ट २०२२ । मुंबई । एंजल वन लिमिटेड या फिनटेक कंपनीने आपल्या डिजिटल प्रथम दृष्टीकोनाद्वारे जुलै २०२२ मध्ये सातत्यपूर्ण वाढीचा वेग कायम ठेवला आहे. कंपनीचा ग्राहक पाया १०.७५ दशलक्षने वाढला आहे. त्यात वार्षिक पातळीवर ८८.३ टक्के वाढ झाली असून जुलै २०२२ दरम्यान एकूण ग्राहक ताबा ०.३४ दशलक्ष झाला आहे.

आपली सातत्यपूर्ण वाढ कायम ठेवताना एंजल वनने ६६.६० दशलक्ष ऑर्डर्स पूर्ण करून ३९.३ टक्क्यांची वाढ वार्षिक टप्प्यावर केली आहे. कंपनीने सरासरी रोजच्या उलाढालीतही वाढ नोंदवली आहे. ती वार्षिक पातळीवर ९३.२ टक्के होऊन १०.३१ ट्रिलियनवर गेली आहे. यामुळे कंपनीच्या एकूण समभाग उलाढाल बाजारपेठ वाट्यात ३० बीपीएस वार्षिक विस्तार झाला आहे. तो जुलै २०२२ मध्ये २२ टक्के झाला आहे. सरासरी ग्राहक फंडिंग बुक १४.२८ अब्ज रूपये होते.

एंजल वन लिमिटेडचे मुख्य वाढ अधिकारी श्री. प्रभाकर तिवारी म्हणाले की, “आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, आमची वाढ भांडवली बाजारपेठेत सध्याच्या चढ उतारांच्या तुलनेत सातत्यपूर्ण राहिली आहे. त्यातून हे दिसून येते की, आम्ही आमच्या क्षमता पूर्ण करण्याबाबत योग्य मार्गावर आहोत. आम्ही आमचे प्लॅटफॉर्म जास्त वापरकर्तास्नेही आणि वैयक्तिकीकृत करण्यासाठी कार्यरत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की, आम्ही आमचे लक्ष्य लवकरच पूर्ण करू.”

एंजल वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गंगाधर म्हणाले की, “एंजल वनची मासिक वाढ ही आम्ही आमच्या ग्राहकांच्या गरजा अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने आणि सेवांद्वारे करत असल्याची खात्री देते. आम्ही समभाग गुंतवणुकीचे लोकशाहीकरण करण्यासाठी आणि भांडवली बाजारपेठांना साध्यता देण्यासाठी काम करत आहोत आणि टायर २, ३ तसेच पलीकडील शहरांमध्ये काम करत असल्याने या वाढीला चालना मिळत आहे.”

एंजल वनने ही उत्पादने अ‍ॅप आणि वेब प्लॅटफॉर्मवरून स्मार्ट एपीआय, स्मार्ट मनी आणि इतर तृतीय पक्ष समावेशासाठी आणली आहेत. ही फिनटेक कंपनी नव्याने आणलेल्या सुपर अ‍ॅपद्वारे वापरकर्ता अनुभव विस्तारित करत आहे. वेब आणि आयओएसवर उपलब्ध असलेला हा अ‍ॅप पाच तत्त्वांवर तयार केलेला आहे (एस.टी.ए.आर.एस.)- साधेपणा, पारदर्शकता, उपलब्धता, विश्वासार्हता आणि वेग.


Back to top button
Don`t copy text!