
दैनिक स्थैर्य । दि. ०८ जुलै २०२३ । मुंबई । एंजल वन लिमिटेड या भारतातील आघाडीच्या फिनटेक कंपनीने उद्योगक्षेत्रात प्रथमच फसवणूक जागरूकता अभियान #जागरूकतेजाभाई सर्व प्लॅटफॉर्म्सवरून सुरू केले आहे. बाजारपेठेतील आघाडीची कंपनी म्हणून रिटेल गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे, असे एंजल वनला वाटते. गुंतवणूकदारांना फसवण्यासाठी घोटाळेबाजांकडून वापरल्या जाणाऱ्या क्लृप्त्यांबाबत शिक्षण देण्याचे, माहिती देण्याचे तसेच जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट या अभियानापुढे आहे.
बाजारात नेहमी आढळणाऱ्या आर्थिक फसवणूकींबाबत जागरूकता वाढवण्याचे उद्दिष्ट या अभियानापुढे आहे. फसवणूकीच्या कृती कशा ओळखाव्यात व टाळाव्यात याबाबत रिटेल गुंतवणूकदारांना शिक्षित व सक्षम करण्याचे काम हे अभियान करते. गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणूका सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने सक्रिय पावले उचलण्यास प्रोत्साहन देऊन त्यांचे संरक्षण करणे हे अभियानाचे लक्ष्य आहे. बहुव्यासपीठ धोरण ठेवून, यूट्यूब, ट्विटर, इन्स्टाग्राम व टेलीग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर, हे अभियान सुरू करण्यात आले आहे. अनेक बाजूंनी परिणाम करून प्रभाव निर्माण करण्याच्या दृष्टीने अभियानाची आखणी करण्यात आली आहे. तेजाभाई या तरुण, बहुआयामी, विनोदी व सर्वांना आपल्याशा वाटणाऱ्या व्यक्तिरेखेसह आठ भागांची मालिका अभियानांतर्गत तयार करण्यात आली आहे. या मालिकेद्वारे तरुण ट्रेडर्सना सोप्या भाषेत संदेश दिले जाणार आहेत.
एंजल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री. प्रभाकर तिवारी म्हणाले, “डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर वाढल्यामुळे सायबर फसवणूकींच्या प्रकरणांमध्येही वाढ होत आहे. बाजारातील एक आघाडीची कंपनी म्हणून रिटेल गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. विशेषत: प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे आमचे कर्तव्य आहे. या अभियानाच्या माध्यमातून आम्ही हलक्याफुलक्या पद्धतीने त्यांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करत आहोत. हे अभियान रोचक आणि माहितीपूर्ण आहे.”
एंजल वन लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश ठक्कर म्हणाले, “भारतामध्ये रिटेल गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे आणि त्यातील बहुतेक गुंतवणूकदार डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून व्यवहार करत आहेत. आजच्या डिजिटल युगाशी संबंधित आर्थिक धोक्यांचा परिचय करून घेणे त्यांच्यासाठी अत्यावश्यक आहे. हे अभियान त्याच दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. आमची डिजिटलकेंद्री संपदासंचय उत्पादने गुंतवणूकदारांना देऊ करतानाच, सुरक्षित व संरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीनेही आम्ही कायमच प्रयत्नशील राहिलो आहोत.”
फिनटेक कंपनी या अभियानाबद्दल आकर्षण निर्माण करण्यासाठी तसेच संबंधित संभाषणांना चालना देण्यासाठी तत्काळ (मोमेंट) मार्केटिंगचा लाभ घेणार आहे. यासाठी स्थिर क्रिएटिव्ह्ज, मायक्रोसाइट्स, पॉडकास्ट्स, ईमेलर्स, अधिसूचना, माहितीपत्रके, पोस्टर्स आदींचा वापर केला जाणार आहे.