एंजेल वनची ग्राहक संख्या ९.२१ दशलक्षवर पोहोचली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०८ एप्रिल २०२२ । मुंबई । एंजेल वन लिमिटेड (पूर्वीची एंजेल ब्रोकिंग लिमिटेड या नावाने ओळखली जाणारी कंपनी) आपल्या तंत्रज्ञानावर आधारित, वापरकर्ता स्नेही उपाययोजनांसह विस्तार करत आहे. या कंपनीने आर्थिक वर्ष २२ मध्ये उत्तम वाढ नोंदवली असून तिने आपला ग्राहक पाया ९.२१ दशलक्ष वाढवला आहे आणि त्यात त्यांनी वार्षिक टप्प्यावर १२३.७ टक्के वाढ मिळवली आहे. त्यांनी मार्च २०२२ मध्ये ०.४८ दशलक्ष ग्राहक मिळवले असून आर्थिक वर्ष २२ मध्ये आपल्या ग्राहकांमध्ये दुप्पट वाढ करून ५.२९ दशलक्ष केली आहे, जी वार्षिक पातळीवर १२३.७ टक्के वाढ आहे.

तंत्रज्ञानावर आधारित प्रयत्न आणि कंपनीतील तंत्रज्ञानात्मक विकास यांच्यामुळे मार्च २०२२ मध्ये कंपनीला ७३.५५ दशलक्ष ऑर्डर्स मिळाल्या आहेत. ही वार्षिक पातळीवरील ७६.३ टक्के वाढ आहे. कंपनीची मार्च २०२२ मध्ये सरासरी रोजची उलाढाल (एडीटीओ) ८.८४ ट्रिलियन रूपये होती आणि ती वार्षिक पातळीवर १२१.६ टक्के वाढ होती. सरासरी ग्राहक फंडिंग बुक १५.६४ अब्ज रूपयांवर पोहोचले असून ही वार्षिक पातळीवर २४.१ टक्के वाढ आहे.

एंजेल वन लिमिटेडचे मुख्य वाढ अधिकारी श्री. प्रभाकर तिवारी म्हणाले की, “आमच्यासाठी आर्थिक वर्ष २०२१-२२ हे खूप फलदायी ठरले कारण आम्ही या वर्षभरात आमच्या ग्राहकांचा पाया दुपटीपेक्षा जास्त वाढवला. सुलभीकृत वित्तपुरवठ्याप्रति आमचे प्रयत्न योग्य दिशेने चालले असल्याचे हे चिन्ह आहे. पुढील वर्षात आम्ही टायर २, टायर ३ आणि त्या पलीकडील शहरांमध्ये संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे आमचे प्रयत्न कायम ठेवू आणि त्यांची आमच्या नावीन्यपूर्णतेवर आधारित उत्पादनांशी ओळख करून देऊ.”

एंजेल वन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गंगाधर म्हणाले की, “मागील वर्षात एंजेल वनच्या प्लॅटफॉर्मवरील आमची तांत्रिक प्रगती झाल्यामुळे आम्ही ९.२१ दशलक्ष ग्राहकांना सेवा दिली आहे. वाढत्या ग्राहक पायासोबत आमचा प्लॅटफॉर्म आणि आमची उत्पादने अधिक विश्वासू आणि चांगली बनवण्याची गरज आम्ही समजतो. यावर्षी आमच्या सुपर अ‍ॅपच्या योजनेनुसार आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मच्या क्षमता सुधारणे आणि अधिक वैयक्तिकीकृत पर्याय देणे यावर लक्ष केंद्रित करू. मालमत्ता निर्मितीच्या उद्योगात एंजेल वनला सर्वाधिक प्राधान्याचे व्यासपीठ बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”


Back to top button
Don`t copy text!