दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२१ । मुंबई । फिनटेक कंपनी, एंजेल वन लिमिटेड (पूर्वी एंजेल ब्रोकिंग लिमिटेड म्हणून ओळखली जात होती) सप्टेंबर २०२१ मध्ये सलग सहाव्या महिन्यात जोरदार कामगिरी करत आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये कंपनीचा क्लायंट बेस ६.५२ दशलक्षपर्यंत वाढला आणि वर्षभरात १४२% वाढ नोंदवली तर योवायची वाढ, ०.३९ दशलक्ष ग्राहकांचे एकूण ग्राहक अधिग्रहण, ९९.३% इतक वार्षिक वाढ नोंदवण्यात आली.
वाढत्या क्लायंट बेसमुळे सर्व व्यवसाय मापदंडांमध्ये सर्वोतोपरी वाढ झाली आहे. कंपनीची एकूण सरासरी दैनिक उलाढाल (एडीटीओ) सप्टेंबर २०२१ मध्ये ३३१% वार्षिक वाढून ६.३५ ट्रिलियन रुपये झाली. एंजल वनच्या सरासरी क्लायंट फंडिंग बुकने सांगितलेल्या महिन्यात ७७% वार्षिक वाढ १४.०८ अब्ज रुपयांवर नेली. त्याचप्रमाणे, व्यापारांची संख्या १०१.०७ दशलक्ष झाली, जी ९७.२% वार्षिक वाढ आहे.
एंजेल वन लिमिटेडचे मुख्य विकास अधिकारी श्री प्रभाकर तिवारी म्हणाले, “आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगसारख्या तंत्रज्ञानाला आमच्या उत्पादनांमध्ये समाकलित करण्याची आमची दृष्टी जेनझेड आणि मिलेनियल्ससाठी एक निर्धोक संपत्ती निर्मितीचा प्रवास सक्षम करणे आहे. आम्ही सतत नवीन प्लॅटफॉर्म एकत्र करण्याच्या दिशेने आणि आमच्या ग्राहकांना प्रगत उत्पादने सादर करण्याच्या दिशेने काम करीत आहोत. येत्या काही महिन्यांत तंत्रज्ञान आधारीत, एंजल वन कुटुंबात, विशेषत: टियर-२, टियर-३ आणि शहरांच्या पलीकडे अधिक सदस्य जोडण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
एंजेल वन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गंगाधर म्हणाले, “आमच्या डिजिटल-फर्स्ट रणनीतीमुळे नाविन्यपूर्णतेसाठी मैदान तयार झाले आहे, ज्यामुळे आज आम्ही विस्तृत क्लायंट बेस तयार केला आहे. तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवांचे एकत्रीकरण करण्याच्या आमच्या एकत्रित प्रयत्नांमुळे भारतीय गुंतवणूकदारांसाठी डिजिटल सेवांमध्ये वाढ झाली आहे. आमच्या पूर्ण सेवेच्या ब्रोकरेज आणि सल्लागार सेवांसह, आम्ही नवीन पिढीच्या गुंतवणूकदारांच्या समकालीन गरजांशी सुसंगत व्यासपीठ तयार करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”