दैनिक स्थैर्य । दि. ८ मे २०२२ । मुंबई । फिनटेक कंपनी एंजेल वन लिमिटेडने एप्रिल २०२२ साठी व्यवसाय वाढीचे आकडे जाहीर केले. त्यांच्या वाढीमध्ये अत्यधिक गुणवत्ता आणि सातत्य दर्शविताना, एंजेल वनने एप्रिल २०२२ मध्ये आपली ग्राहकवृद्धी ९.६४ दशलक्ष पर्यंत वाढविली आहे म्हणजेच यात वार्षिक ११८.१ टक्के झाली आहे. महिन्यातील कंपनीचे एकूण ग्राहक संपादन ०.४४ दशलक्ष आहे, म्हणजे यात ४१.५ टक्के वाढ झाली आहे.
एप्रिल २०२२ मध्ये ६६.१४ दशलक्ष ऑर्डर्स, ६५.७ टक्के वायओवाय वाढ, कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर ग्राहकांच्या उच्च स्तरावरील हालचाली दर्शवितात. एप्रिल २०२२ साठी एंजेल वनची एकूण सरासरी दैनिक उलाढाल एडीटीओ ११४.४ टक्के, जी वार्षिक ९.४७ ट्रिलियन रुपये वाढली. सरासरी क्लायंट फंडिंग बुकमध्ये ५२.९ टक्के वार्षिक वाढ होऊन १७.१६ अब्ज रुपये इतकी झाली आहे. कंपनीचा एकूण रिटेल इक्विटी उलाढाल बाजाराचा २१.३ टक्के वाटा आहे.
एंजेल वन लिमिटेडचे मुख्य विकास अधिकारी श्री. प्रभाकर तिवारी म्हणाले, “आम्हाला आनंद आहे की, नवीन आर्थिक वर्ष आमच्या क्लायंट बेसमध्ये महत्त्वपूर्ण विस्तारासह उच्च स्थानी सुरू झाले आहे. आमचे ध्येय आहे की, डिजिटल गुंतवणूक उत्पादने आणि सेवा देशभरातील प्रत्येकासाठी प्रवेशयोग्य बनविणे. एंजेल वन टियर २, ३ आणि शहरांच्या पलीकडे, ग्राहकांना आमच्या सेवा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करत राहील. प्रत्येकजण सुलभ आर्थिक आणि संपत्ती निर्माण करणा-या उत्पादनांमध्ये प्रवेशास पात्र आहे.”
एंजेल वन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गंगाधर म्हणाले, “आम्ही नेहमीच सर्व विभागांमधील गुंतवणूकदारांना अत्याधुनिक उपाय देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. भांडवल बाजारात त्यांच्या गुंतवणूकीच्या प्रवासासाठी अधिक लोक एंजेल वनची निवड करताना पाहणे रोमांचक आहे. हे आम्हाला उद्योगातील सर्वोत्तम उपलब्ध सेवा देण्यासाठी आत्मविश्वास आणि जबाबदारी देते. हेच लक्षात घेऊन आम्ही ग्राहकांच्या अभिप्रायावर आधारित आमच्या सेवा सतत सुधारत आहोत आणि शक्य तितक्या वापरकर्त्यासाठी अनुकूल बनवित आहोत.”