दैनिक स्थैर्य । दि. १२ मार्च २०२२ । मुंबई । फिनटेक कंपनी एंजेल वन लिमिटेडने आपल्या मासिक व्यावसायिक आकडेवारीची घोषणा केली आहे. आपला विस्ताराचा वेग कायम ठेवताना कंपनीचा ग्राहकांचा पाया फेब्रुवारी २०२२ मध्ये ८.७६ दशलक्षवर गेला असून ही १३३.६ टक्के वार्षिक पातळीवरील वाढ आहे. ग्राहकांच्या पायातील वाढ महिन्यात ०.४५ दशलक्ष ग्राहक ताब्यामुळे झाली असून ही वार्षिक स्तरावरील ५४.० टक्के वार्षिक वाढ आहे.
या फिनटेक कंपनीने महिन्यात ७०.३० दशलक्ष ऑर्डर्स नोंदवल्या असून ही वार्षिक स्तरावरील ७४.८ टक्के वाढ आहे. एंजेल वनची फेब्रुवारी २०२२ साठीची सरासरी रोजची उलाढाल (एडीटीओ) ८.८८ ट्रिलियन होती, जी वार्षिक पातळीवर १२१.७ टक्के वाढ होती. सरासरी ग्राहक निधी पुस्तकात वार्षिक पातळीवर ७७.८ टक्के वाढ झाली असून ती १६.३८ अब्ज होती. त्याचप्रमाणे कंपनीचा एकूणच रिटेल समभाग बाजार वाटा २०.८ टक्के राहिला आहे.
एंजेल वन लिमिटेडचे मुख्य वाढ अधिकारी श्री. प्रभाकर तिवारी म्हणाले की, “आम्ही आमच्या ग्राहकांना आमच्या तंत्रज्ञानाने अद्ययावत डिजिटल व्यासपीठांद्वारे अद्ययावत सेवा देत आहोत. त्यामुळे ग्राहकांच्या पायात सातत्यपूर्ण वाढ होऊ लागली आहे. आमचे ध्येय देशभरातील लोकांसाठी वित्त आणि संपत्ती निर्मितीचे सुलभीकरण करण्याचे आहे. याच दृष्टीकोनातून आम्ही टायर २, ३ आणि त्यापुढील शहरांमधील शोधल्या न गेलेल्या क्षमतांचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू ठेवणार आहोत.”
एंजेल वन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गंगाधर म्हणाले की, “दर महिन्याला जास्तीत जास्त लोक अत्यंत सुलभ डिजिटल सेवा वापरत आहेत, याचा आम्हाला आनंद झाला आहे. आमचे ध्येय ग्राहकांचा अनुभव अधिक सुलभ आणि चांगला बनवण्याचे आहे. आमची तांत्रिक टीम एका सुपर अॅपवर काम करते आहे, जे सध्या बीटा टेस्टिंग टप्प्यात आहे. हे अॅप पुढील तिमाहीत बाजारात येईल. आमचे प्राधान्य उत्तम वापरकर्ता अनुभवाला आहे आणि आम्ही हे घडवून आणण्यासाठी शक्य ते सर्व करू.”
फिनटेक कंपनीने डिजिटली आणि तंत्रज्ञानात्मक दृष्टीने अद्ययावत उपाययोजनांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. सध्या ती एक सुपर अॅप तयार करत आहे, ज्यात वापरकर्त्यांना एकाच अॅपद्वारे विविध प्रकारच्या वित्तीय सेवांचा अनुभव घेता येईल.