दैनिक स्थैर्य । दि.०७ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । फिनटेक कंपनी एंजेल वन लिमिटेडने जानेवारी २०२२ मध्ये आपल्या ग्राहकसंख्येचा ८.३४ दशलक्षांपर्यंत विस्तार करत प्रचंड वाढ नोंदवली आहे, या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत १४०.९ टक्के आणि गेल्या महिन्याच्या तुलनेत ७.२ टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या ग्राहकवर्गामध्ये एका महिन्याच्या कालावधीमध्ये ०.५४ दशलक्ष ग्राहकांची भर पडली असून ही वाढ ८९.७ टक्के वायओवाय आणि १६.४ टक्के एमओएम इतकी राहिली आहे.
या फिनटेक कंपनीची वाढ विविध व्यावसायिक निकषांवर सरासरी दैनंदिन उलाढालीमध्ये प्रतिबिंबित झाली आहे, ज्यात जानेवारी २०२२ मध्ये १५१.४ टक्के वायओवय वाढ होऊन ती रु. ८.१५ ट्रिलियन पर्यंत पोहोचली आहे. सरासरी क्लायन्ट फंडिंग बुकमध्ये १२४.२ टक्के रुपयांची वाढ होऊन हे व्यवहार १५.८२ बिलियन रुपयांपर्यंत पोहोचले. त्याचबरोबर एंजेल वनने जानेवारी २०२२ मध्ये ६६.९५ दशलक्ष ऑर्डर्स नोंदवल्या. ही वाढ १०३.८ टक्के वायओवाय इतकी होती. दरम्यानकंपनीचा एकूण इक्विटी मार्केट शेअर २१.१ टक्के इतका वाढला हा विस्तार १४३ बीपीएस इतका होता.
एंजेल वन लि.चे चीफ ग्रोथ ऑफिसर प्रभाकर तिवारी म्हणाले, “आमच्या अद्ययावत सेवा आणि या सेवा अद्यापही जिथे पोहोचलेल्या नाहीत अशा द्वितीय व तृतीय श्रेणी शहरांतील व त्याहीपलीकडील बाजारपेठांतील ग्राहकवर्ग मिळविण्याचे निश्चित उद्दीष्ट डोळ्यांसमोर ठेवून आखलेली डिजिटल मार्केटिंग धोरणे यामुळे आमच्या महिन्यागणिक होणा-या वाढीला चालना मिळत आहे. आम्ही नव्या युगातील गुंतवणूकदारांना आम्ही स्टॉक्समधील गुंतवणुकीच्या माध्यमातून कोणत्याही अडचणीशिवाय संपत्ती निर्माण करण्याचे मार्ग दाखवतो. नजिकच्या भविष्यामध्ये आम्ही आमच्या ग्राहकांसाठी गुंतवणुकीचे आणखी पर्यायही देऊ करणार आहोत.”
एंजेल वन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण गंगाधर म्हणाले, “एंजेल वनच्या तंत्रज्ञानावरील हुकुमतीमुळे ग्राहकांकडून प्राधान्याने निवडण्यात येणा-या डिजिटल इन्व्हेस्टमेंट मंचांच्या यादीत तिचे नाव दाखल झाले आहे. मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळविण्याच्या आघाडीवर आम्ही सातत्याने नोंदवलेली वाढ म्हणजे आम्ही आमच्या ग्राहकांना हव्या असलेल्या सेवा पुरवित आहोत याचेच द्योतक आहे. २०२२ मध्ये आम्ही एंजेल वनचे सुपर अॅपही दाखल करत आहोत, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना गुंतवणुकीचा अधिक चांगला अनुभव मिळू शकेल.”
एंजेल वनकडून आपल्या ८.३४ दशलक्षांच्या ग्राहकवर्गाला अनेक गुंतवणूक उत्पादने पुरविली जातात. एआरक्यू प्राइमसारखे नियमाधारित इन्व्हेस्टमेंट इंजिन ते स्मार्ट एपीआयपर्यंत अनेक वैशिष्ट्यांनी समृद्ध उत्पादने एंजेलच्या ग्राहकांना उपलब्ध केली जातात. याखेरीज कंपनीद्वारे स्मार्ट मनीसारखे गुंतवणूकदारांच्या वित्तीय साक्षरतेसाठीचे कार्यक्रमही राबवले जातात. स्मॉल केस, व्हेस्टेड, सेन्सिबुल इत्यादी कंपन्यांशी केलेल्या थर्ड पार्टी पार्टनरशिपमुळे आपल्या वेगाने विस्तारणा-या ग्राहकवर्गाला सेवांचा परिपूर्ण संच पुरविणे एंजेल वनला शक्य होत आहे.