एंजेल वनने तिस-या तिमाहीचे आर्थिक परिणाम जाहीर केले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २२ एप्रिल २०२२ । मुंबई । एंजेल वन लिमिटेडने ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीचे आणि वार्षिक आर्थिक परिणाम जाहीर केले. २०२२ च्या तिस-या तिमाहीच्या १.३ दशलक्ष ग्राहकसंख्येच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत १.५ दशलक्षपर्यंतची मोठी कंपनीने वाढ अनुभवली आहे. कंपनीचे एकत्रित एकूण उत्पन्न आर्थिक वर्ष २०२२च्या तिस-या तिमाहीच्या रु. ६०७१ दशलक्षच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत रु. ६८५३ दशलक्ष झाले आहे. तिमाही दर तिमाही आधारावर यात १२.९ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीच्या एकत्रित एकूण उत्पन्नात आर्थिक वर्ष २०२२ मध्ये २३,०५१ दशलक्ष रुपये वाढ झाली आहे. हीच वाढ २१मध्ये १२,९९० दशलक्ष रुपये होती.

कंपनीने ईबीटीडीएमध्ये २३.९% टक्क्यांची त्रैमासिक वृद्धी घेतली आहे. ते तिस-या तिमाहीच्या रु. २२५६ दशलक्षच्या तुलनेत रु. २७९५ दशलक्ष झाले आहे. यात वार्षिक ९९.१ टक्के वाढ झाली असून २०२१ मधील रु. ४२९५ दशलक्षच्या तुलनेत आर्थिक वर्ष २२ मध्ये रु. ८५५४ दशलक्ष झाले आहे.

कंपनीचा सातत्यपूर्ण कार्यान्वयनातून एकत्रित करोत्तर नफा तिस-या तिमाहीच्या रु. १६४६ दशलक्षच्या तुलनेत तिमाही दर तिमाही २४.४ टक्के वाढीसह चौथ्या तिमाहीत रु २०४८ दशलक्ष झाला आहे. संचालक मंडळाने प्रत्येकी १० रूपयांच्या समभागावर ९.२५ रुपयांचा लाभांश शिफारस केला आहे. हा अंतिम आणि अंतरिम लाभांशाचे एकत्रीकरण असून तो तिमाहीसाठी करोत्तर नफ्याच्या ३७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

एंजेल वनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश ठक्कर म्हणाले की, “आर्थिक वर्ष २०२२ हे एक महत्त्वाचे वर्ष होते. भारताने या काळात भांडवली बाजारपेठेत अनेक महत्त्वाचे टप्पे पार केले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एका वर्षात सर्वाधिक ग्रॉस क्लायंट एडिशन, वाढता रिटेल सहभाग आणि त्यामुळे सर्वोच्च रोजची उलाढाल नोंदवली गेली आहे. यातून बचतीचे वाढते आर्थिकीकरण दिसत असून एंजल येथे एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, एंजल वनने भारताच्या एकूण तसेच कार्यरत डिमॅट अकाऊंटमध्ये १० टक्क्यांपेक्षा अधिक बाजार वाटा नोंदवला आहे. आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देण्याच्या प्रयत्नांचा हा परिपाक आहे.”

एंजेल वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गंगाधर म्हणाले की, “एंजल वनने आमच्या सर्व कार्यान्वयन आणि आर्थिक बाबींमध्ये २०२२ मधल्या सर्वोत्तम तिमाहीचा अनुभव घेतला आहे. आमच्याकडे सर्वाधिक ग्राहक समावेश, सर्वोत्तम तिमाही ऑर्डर्स, विक्रमी तिमाही महसूल आणि नफा आला आहे आणि आम्ही ९० लाख ग्राहकांचा टप्पा पूर्ण करत आहोत. आमचा ग्राहक केंद्री दृष्टीकोन आमच्या उत्पादनांमधून दिसून येतो आणि त्यातून आम्ही ग्राहकांना उत्तम फायदा देतो. आम्ही मागील दोन महिन्यांमध्ये वाढीव कार्यरत ग्राहकांबाबत एनएसईवर दुसऱ्या क्रमांकावर असून त्यातच याचे प्रतिबिंब दिसते.”


Back to top button
Don`t copy text!