एंजेल वनने तिस-या तिमाहीचे आर्थिक परिणाम जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.१९ जानेवारी २०२२ । मुंबई । एंजेल वन लिमिटेडने ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या त्रैमासिक व नऊ महिन्यांचे एकत्रित आर्थिक परिणाम जाहीर केले. २०२२ च्या दुस-या तिमाहीच्या १.३४ दशलक्ष ग्राहकसंख्येच्या तुलनेत तिस-या आर्थिक वर्ष २०२२च्या दुस-या तिमाहीच्या रु. ५३८२ दशलक्षच्या तुलनेत तिस-या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न रु. ६०७१ दशलक्ष झाले आहे. तिमाही दर तिमाही आधारावर यात १२.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०२१च्या पहिल्या ९ महिन्यांच्या ८०८१ दशलक्षच्या तुलनेत २०२२ च्या पहिल्या ९ महिन्यात वार्षिक आधारावर ८४ टक्के वाढीसह एकूण उत्पन्न १६१९७ दशलक्ष रुपये झाले आहे.

कंपनीने ईबीटीडीएमध्ये २२.७% टक्क्यांची त्रैमासिक वृद्धी घेतली आहे. ते दुस-या तिमाहीच्या रु. १८३९ दशलक्षच्या तुलनेत रु. २२५६ दशलक्ष झाले आहे. यात वार्षिक १०३.३ टक्के वाढ झाली असून २०२१च्या पहिल्या ९ महिन्यांच्या २८३२ दशलक्षच्या तुलनेत या आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांत ५७५८ दशलक्ष झाले आहे.

कंपनीचा सातत्यपूर्ण कार्यान्वयनातून एकत्रित करोत्तर नफा दुस-या तिमाहीच्या १३४३ दशलक्षच्या तुलनेत तिमाही दर तिमाही २२.६ टक्के वाढीसह तिस-या तिमाहीत १६४६ दशलक्ष झाला आहे. संचालक मंडळाने प्रत्येकी १० रूपयांच्या समभागासाठी ७.० रूपये अंतरिम लाभांश सुचवला आहे, जो तिमाहीसाठी ३५ टक्के एकत्रित करोत्तर नफ्याच्या समकक्ष आहे.

एंजेल वनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश ठक्कर म्हणाले की, “एंजेल ही एक प्रवर्तक कंपनी असून तिने भारताच्या समभाग संस्कृतीचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज एंजेल ही अत्यंत महत्त्वाची डिजिटल कंपनी झाली आहे जी अत्यंत वेगाने वाढते आहे. आमची डिजिटल व्याप्ती आणि एक्टिव्हेशन इंजिन्स आमच्या वाढीला चालना देत आहेत. आमच्या खोलवर रूजलेल्या क्षमता आणि ग्राहकस्नेही उत्पादने यांच्यामुळे आम्हाला ७.८ दशलक्ष ग्राहकांचे कुटुंब होता आले आहे आणि त्यामुळे डिसेंबर २०२१ नुसार भारताच्या डिमॅट खात्यात ८.७ टक्के बाजारवाटा घेता आला आहे.”

एंजेल वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गंगाधर म्हणाले की, “२०२२ ची तिसरी तिमाही आमच्यासाठी ऐतिहासिक ठरली आहे कारण आम्ही कार्यान्वयन आणि वित्तीय या दोन्ही स्वरूपांत नवीन टप्पे पूर्ण केले आहेत. आम्ही प्रवासांमध्ये विश्वासार्हता आणि ऑप्टिमायझेशन वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे व्यवसाय वाढला आहे. डेटा सायन्सच्या बाबतीत विचार केल्यास आम्ही विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे ग्राहकांची खरेदी तसेच कार्यान्वयन नवीन मशीन लर्निंगवर आधारित मॉडेल्सचा विकास होऊन वाढले आहे. सुधारित केवायसी आणि इन अॅप प्रवासांमुळे ग्राहकांचे ऑनबोर्डिंग आणि नेव्हिगेशन सुधारले आहे. अँजेलने मोबाइल नंबरचा वापर करून ऑनबोर्डिंगदरम्यान रियल टाइम बँक खाते ओळखण्यात आघाडी घेतली आहे. हा उद्योगातील पहिला उपक्रम आहे.


Back to top button
Don`t copy text!