
दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२२ । मुंबई । एंजल वन लिमिटेडने ३० जून २०२२ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक परिणाम जाहीर केले. कंपनीने २०२३ च्या पहिल्या तिमाहीत १.३ दशलक्ष ग्राहकांची एकूण वाढ अनुभवली असून या तिमाहीच्या काळात १० दशलक्ष ग्राहक टप्पा पार केला आहे. कंपनीचे एकत्रित उत्पन्न पहिल्या तिमाहीत ६८६५ दशलक्ष रूपये झाले आहे ते आर्थिक वर्ष २०२२ च्या चौथ्या तिमाहीत ६८५३ दशलक्ष रूपये होते.
कंपनीचा एकत्रित ईबीडीएटी गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत २७९५ दशलक्ष रूपये होता जो या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २४९१ दशलक्ष रूपये झाला आहे. यात वार्षिक पातळीवर १०.९ टक्के घट झाली आहे. कंपनीचा सातत्यपूर्ण कार्यान्वयनातून करोत्तर एकत्रित नफा गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीच्या २०४८ दशलक्ष रुपयांच्या तुलनेत या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १८१६ दशलक्ष रूपये झाला आहे. यात वार्षिक पातळीवर ११.३ टक्क्यांची घट झाली आहे. संचालक मंडळाने प्रत्येकी १० रूपयांच्या समभागांवर ७.६५ रूपयांचा लाभांश अंतरिम लाभांश म्हणून शिफारस केला आहे. या तिमाहीसाठी तो एकत्रित करोत्तर नफ्याच्या ३५ टक्के आहे.
एंजल वनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश ठक्कर म्हणाले की, “भारतात बचतींच्या वित्तीकरणाबाबत मोठ्या प्रमाणावर आणि मुलभूत बदल होताना दिसत आहेत. ते आपल्याला डिमॅट खाते तसेच कॅश ट्रेड्स आणि एफअँडओ काँट्रॅक्ट्समध्ये क्यू २३ मध्ये अनुक्रमे ७.६ टक्के आणि १० टक्क्यांच्या स्वरूपात दिसून येतात. रिटेल गुंतवणूकदार हे सलग नऊ महिने निव्वळ ग्राहक होते. त्यांनी एनएसईवर १.४ ट्रिलियन रूपयांची गुंतवणूक रोख वर्गात केली असून इंडिया आयएनसीवर सप्टेंबर १६ पासून सर्वाधिक म्हणजे सुमारे ९.७ टक्के वाटा घेतला आहे.”
एंजलच्या तंत्रज्ञान केंद्रीभूत दृष्टीकोनामुळे व्यवसाय नुसता तगच धरत नाही आम्हाला बाजारातले स्थान उत्तम राखण्यासाठी मदत केली आहे. आम्ही ग्राहकांना सर्वोत्तम गुंतवणूकीचा अनुभव देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्याचे आम्हाला खूप फायदे दिसत असल्याचे मागील अनेक तिमाहींमधील उत्तम कार्यान्वयन कामगिरीतून दिसून आले आहे. आम्ही एकूण डिमॅट खात्यांमध्ये, वाढत्या डिमॅट खाते आणि एनएसई अॅक्टिव्ह क्लायंट बेसवर आमचा बाजारवाटा वाढवू लागलो आहोत.
एंजल वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गंगाधर, म्हणाले की, “मागील तिमाही आमच्यासाठी ऐतिहासिक होती. आम्ही १० दशलक्ष ग्राहकांचा पाया पूर्ण करणाऱ्या अनेक कंपन्यांपैकी एक ठरलो आहोत. आमचे शक्तिशाली कार्यान्वयन निकष बाजारातील चढउतार होत असतानाही आमच्या बिझनेस मॉडेलची तग धरून राहण्याची क्षमता दर्शवतात. आता सलग ३९ महिने आम्ही फ्लॅट प्रायसिंग रचनेकडे स्थलांतरित झालो आहोत. आम्हाला जवळपास ८० टक्क्यांपेक्षा जास्त घटनांमध्ये वाढ दिसून आली आहे. त्याचवेळी प्रमुख इंडेक्स फक्त ५ टक्क्यांनी वाढले होते. आम्हाला आमच्या बिझनेस मॉडेलच्या टिकाऊपणाबद्दल खूप आत्मविश्वास वाटतो आणि आमचा विश्वास आहे की, आमची माध्यमे आमच्या लक्ष्याधारित बाजारपेठांमधून अधिक चांगली वाढ देण्यासाठी सुविधा देतील.”