एंजेल ब्रोकिंगद्वारे पहिल्या तिमाहीत १.२० दशलक्ष नव्या ग्राहकांची नोंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ८ जुलै २०२१ । मुंबई। एंजेल ब्रोकिंगने विक्रमी प्रगती साधत वित्तवर्ष २०२२ च्या पहिल्या तिमाहीत १.२० दशलक्ष नव्या ग्राहकांची नोंद केली. वार्षिक आधारे ही २४७% वृद्धी नोंदवली गेली. जून २०२१ मध्ये फिनटेक ब्रोकरने ०.४६ दशलक्ष एकूण ग्राहक जोडले. मे २०२१ मधील विक्रम यावेळी त्यांनी मोडित काढला. याच प्रकारे ३० जून २०२१ मध्ये ग्राहक वर्ग विस्तारत ५.२९ दशलक्षांपर्यंत पोहोचवला.

जून २०२० पर्यंत ग्राहकवर्ग १४५% पेक्षा जास्त आणि मार्च २०२१ मध्ये २८.४% पेक्षा जास्त वाढला. ही प्रगती म्हणजे संस्थेच्या कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मशीन लर्निंग आधारीत सोल्युशन्सचा परिणाम आहे. एंजेल ब्रोकिंगने तिमाहीच्या आधारे सरासरी दैनिक उलाढाल २१.१% नी वाढीचा विक्रम नोंदवत, वित्तवर्ष २०२२ मधील पहिल्या तिमाहीत हा आकडा ४.५ ट्रिलियन रुपयांपर्यंत नोंदवला. याचप्रमाणे सरासरी ग्राहकांचा फंडिंग बुकही २६.५% नी वाढून १२.१९ अब्ज रुपयांपर्यंत वाढला. मजबूत तंत्रज्ञान सुविधांचा फायदा घेत एंजेल ब्रोकिंगने वित्तवर्ष २०२२ मधील पहिल्या तिमाहीत २४८.५३ दशलक्ष रुपयांचा व्यापार केला.

एंजेल ब्रोकिंगचे चीफ ग्रोथ ऑफिसर, प्रभाकर तिवारी म्हणाले, “आमच्या प्रगत आयटी सुविधा आणि तंत्रज्ञान आधारीत ऑपरेशन्सद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांना उत्कृष्ट संपत्ती निर्माण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. एआय आणि एमएलवरील आम्ही विशेष भर दिल्याने ग्राहक आकर्षित होत आहेत. भारतातील वाढता रिटेल सहभाग पाहता भविष्यातील वृद्धीबाबत आम्ही आशावादी आहोत आणि वाढत्या ग्राहक वर्गाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सज्ज आहोत. या यशाबद्दल एंजेल ब्रोकिंगची टीम, आमचे भागीदार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे ग्राहक यांचे आम्ही आभारी आहोत.”

एंजेल ब्रोकिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नारायण गंगाधर म्हणाले, “ भारतातील सर्वात मोठी, सर्वात विश्वासार्ह फिनटेक कंपनी म्हणून उदयास येण्याचा आमचा उद्देश आहे. म्हणूनच ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचे आमचे लक्ष्य आहे. एंजेल ब्रोकिंगमध्ये, आम्ही तंत्रज्ञानाने विकसित असूनही वापरण्यास सुलभ अशा सेवांचे समूह तयार करून लोकांना सक्षम बनवण्यावर आमचा भर असतो. सर्व क्षमतांच्या पातळीवरील गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सच्या गरजा आम्ही पूर्ण करत आहोत.”


Back to top button
Don`t copy text!