स्थैर्य, मुंबई, दि. १७: मागील महिन्यातील विक्रमी मासिक ग्राहक अधिग्रहणानंतर फिनटेक ब्रोकर, एंजेल ब्रोकिंगने जून २०२१ मधील ग्राहक जोडणीची परंपरा सुरूच ठेवली. भारतात शेअर बाजारातील सहभाग जोरदार वाढल्याने, एंजेल ब्रोकिंगनेही बाजारातील उत्साह आणखी वाढवला. वेगाने मासिक ग्राहक जोडणीच्या दरासह ‘५ दशलक्ष ग्राहक’ जोडणीचा मैलाचा दगड यशस्वीरित्या पार केला.
एंजेल ब्रोकिंगने मे २०२१ मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक मासिक ग्राहक नोंदणी केली. ती ०.४३ दशलक्षपर्यंत झाली. गेल्या आर्थिक वर्षात मासिक सरासरीच्या दुप्पट ही आकडेवारी होती. त्यानंतर ग्राहक जोडणीचा दर तिमाहीनुसार वाढतच राहिला. २०२१ वित्तवर्षातील चौथ्या तिमाहीत तो १४ पटींनी वाढून ०.९६ दशलक्ष होता. तर वित्तवर्ष २०२० मधील पहिल्या तिमाहीत तो ०.१० दशलक्षांपेक्षा कमी होता. एंजेल ब्रोकिंगने ऍव्हरेज डेली टर्नओव्हर अंदाजे ४.८ ट्रिलियन रुपये नोंदवला. २०२० मधील पहिल्या तिमाहीच्या २५३ अब्ज रुपयांच्या तुलनेत १९ पट जास्त होता.
संपूर्ण प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगचा वापर करण्यावर कंपनीने लक्ष केंद्रित केल्याचा हा परिणाम आहे. फिनटेक ब्रोकरनने एक उत्कृष्ट आणि अखंड ग्राहक अनुभवाची हमी दिली असल्याने टीअर २, टीअर ३ मार्केट आणि त्याही पलिकडील बाजारात खोलवर प्रवेश मिळवला आहे. कंपनीने मोबाइल ऍप, वेब प्लॅटफॉर्म आणि विशेष सॉफ्टवेअर सूटसह डिजिटल चॅनलच्या व्यापक कक्षेत सेवा उपलब्धतेसह यूझर-फ्रेंडली इंटरफेस विकसित केला आहे. एंजेल ब्रोकिंगच्या उत्कृष्ट तंत्रज्ञान सुविधांमुळे ग्राहक जोडणीचा सरासरी वेळही ५ मिनिटांपेक्षा कमी झाला आहे.
एंजेल ब्रोकिंगचे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री प्रभाकर तिवारी म्हणाले, “मागील काही वर्षात एंजेल ब्रोकिंगने डिजिटल परिवर्तनाच्या मार्गावर भरपूर मेहनत घेतली आहे. आमचे एकत्रित प्रयत्न इप्सित परिणाम देताना पाहून छान वाटत आहे. मात्र हा प्रवास नुकताच सुरु झाला आहे, असा आम्हाला विश्वास आहे. भारतातील रिटेल सहभाग अजूनही ४ टक्क्यांच्या वर आहे. सध्या आपल्याला मिळत असलेला प्रतिसाद म्हणजे हिमनगाचे एक टोक आहे. येत्या काही वर्षात या उद्योगाला गुंतवणूकदारांच्या मोठ्या लाटेची तयारी ठेवावी लागेल.ही पिढील परिपूर्णतेद्वारेच स्थिर होईल.”
२०१६ मध्ये डिजिटल परिवर्तनास प्रारंभ केल्यापासून, एंजेल ब्रोकिंगने अनेक अत्याधुनिक डिजिटल बदल केले. महत्त्वाकांक्षी मिलेनिअल्स आणि जेनरेशन झेड गुंतवणूकदारांच्या परिपूर्णतेच्या प्रयत्नांसाठी हे उत्तम साधन ठरले. उदा. यांचे नियम- आधारीत गुंतवणूक इंजिन एआरक्यू प्राईमने पहिल्याच वर्षी बीएसई १०० इंडेक्सवर ६० टक्क्यांपेक्षा आरोग्यदायी मार्जिन घेतली. त्यानंतर फिनटेक ब्रोकरने शैक्षणिक प्लॅटफॉर्म, स्मार्ट मनीद्वारे गुंतवणूकदार आणि ट्रेडर्ससाठी वर्कशॉप घेतले. फ्री-टू इंटिग्रेट एपीआय प्लॅटफॉर्म ‘स्मार्ट एपीआय’ द्वारे भारतातील नव्या काळातील ट्रेडर्सच्या गरजा पूर्ण केल्या. स्मार्ट एपीआयचा वापर करत, गुंतवणूकदार एंजेल ब्रोकिंगच्या विस्तृत ऐतिहासलिक डेटाचा लाभ घेत आधुनिक चार्ट तसेच प्रीबिल्ट स्ट्रॅटजी वापरत ऑटोमेटेड ट्रेड करू शकतात. ट्रेडिंग संबंधी प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी स्टार्टअप आणि वित्तीय संस्था स्मार्ट एपीआयचाही वापर करू शकतात.
एंजेल ब्रोकिंगचे सीईओ श्री नारायण गंगाधर म्हणाले, “एंजेल ब्रोकिंग ही भारतातील सर्वात मोठी, विश्वासार्ह आणि सर्वात प्रतिष्ठित फिनटेक कंपनी होण्याच्या मोहिमेवर आहे. आम्ही योग्य दिशेने प्रवास करत आहोत, याचा उत्तम दाखला म्हणजे ५ दशलक्ष ग्राहक जोडणीचा गाठलेला टप्पा. आम्ही तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या, वापरण्यास सुलभ असलेल्या सेवा समूह तयार करून अधिकाधिक ग्राहकांचे समाधान करण्याची हमी घेतो. भारतातील गुंतवणुकीत तंत्रज्ञान हा अपरिहार्य घटक बनवत लोकांना सक्षम करण्याची कल्पना त्यामागे आहे. प्रत्येक भारतीयाच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये या ऍसेट क्लासचा समावेश करण्याचे आमचे ध्येय आहे.”
एंजेल ब्रोकिंगने उत्पादने, सेवा आणि इतर फिनटेक कंपन्यांच्या नावीन्यपूर्ण सोल्युशनसह विस्तृत संच तयार केला आहे. या खुल्या इमारतीत, त्याने स्ट्रीकसारख्या बऱ्याच फिनटेक प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी केली आहे. ज्यामुळे ग्राहकांना सोपी भाषा वापरत त्यांचे धोरण विकसित आणि वापरणे शक्य होईल. या आघाडीच्या टेक स्टॉक ब्रोकरने ‘स्मॉलकेस’ बरोबर हातमिळवणी केली असून याद्वारे स्टॉक आणि एक्सचेंज ट्रेडेड फंडचे निवडक पोर्टफोलिओची सुविधा मिळते. अमेरिकेतील गुंतवणूक प्लॅटफॉर्म ‘व्हेस्टेड’ आणि भारतातील आघाडीचा ऑप्शन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म ‘ सेन्सीबुल’ च्या सुविधा इतरांसह एंजेल ब्रोकिंगसाठीही उपलब्ध आहेत.