एंजेल ब्रोकिंगने सेन्सीबुलच्या माध्यमातून ऑप्शन ट्रेडिंग सुलभ केले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.२६: एंजेल ब्रोकिंगने सेन्सीबुल या ऑप्शन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी करत ग्राहकांना ऑप्शन ट्रेडिंग क्षेत्र हाताळण्यात मदत केली आहे. या भागीदारीद्वारे गुंतवणूकदारांना सोप्या आणि प्रभावी ऑप्शन स्ट्रॅटजीद्वारे जास्त नफा कमावण्याच्या स्ट्रॅटजी प्रदान केल्या जातील.

या समावेशकतेमुळे, एंजेल ब्रोकिंगच्या ग्राहकांना व्हर्चुअल ट्रेडिंग आणि स्ट्रॅटजी बिल्डर यासारख्या सुविधा मिळतील. याद्वारे खऱ्या पैशांव्यतिरिक्त ग्राहकांना ऑप्शन ट्रेडिंगचा सराव करता येतो. एवढेच नाही तर त्यांच्या स्वत:च्या ऑप्शन ट्रेडिंग स्ट्रॅटजी ठरवता येतात. गुंतवणूकदारांसाठी ऑप्शन ट्रेडिंग अधिक सुलभ करण्याचा उद्देश या भागीदारीमागे आहे. निफ्टी, बँक निफ्टी आणि डॉलर ऑप्शनसाठी मार्केटमधील अप्स आणि डाऊननुसार, सेन्सीबुल गुंतवणूकदारांना वैयक्तिकृत धोरणांची शिफारस करते.

या भागीदारीमुळे, एंजेल ब्रोकिंगच्या ग्राहकांना रिअल-टाइम ट्रेड शिफारशी मिळत आहे. विशेष म्हणजे या शिफारशी सेबी-नोंदणीकृत तज्ञांकडून सोशल मॅसेजिंग अॅप्स आणि एंजेल ब्रोकिंग प्लॅटफॉर्मवरून दिल्या जातात. संबंधित टार्गेट आणि स्टॉपलॉसनुसार स्टॉक शिफारशींचे अलर्ट दिले जातात. सेन्सीबुलच्या स्ट्रॅटजी विझार्ड सुविधेत गुंतवणूकदारांना स्टॉकच्या दिशेचे मूल्यांकन करता येते. तसेच उत्कृष्ट ऑप्शन ट्रेडिंगचा दृष्टीकोन मिळतो.

एंजेल ब्रोकिंगचे, मुख्य विकास अधिकारी, श्री प्रभाकर तिवारी म्हणाले, “ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सुविधा प्रदान करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान सोल्युशन्सचा समावेश करण्यावर एंजेल ब्रोकिंगचा विश्वास आहे. ऑप्शन ट्रेडिंग हा सर्वात गुंतागुंतीच्या भागांपैकी एक आहे. विशेषत: पहिल्यांदा गुंतवणूकदारांसाठी ही स्थइती असते. सेन्सीबुलसोबत भागीदारी केल्याने, आम्ही ग्राहकांना अत्यंत आधुनिक आणि सोपे ऑप्शन ट्रेडिंग सोल्युशन्स पुरवतो.”

एंजेल ब्रोकिंगचे सीएमडी श्री दिनेश ठक्कर म्हणाले, “रिअल टाइम शिफारशींच्या माध्यमातून, आम्ही ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करत आहोत. नुकत्याच जोडलेल्या सुविधेद्वारे आम्ही ग्राहकांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतो तसेच या सेगमेंटमधील एकूण जोखीम कमी करत आहोत. त्यामुळे एकंदरीत संपत्ती निर्मितीत आम्ही योगदान देत आहोत.”


Back to top button
Don`t copy text!