स्थैर्य, मुंबई, दि.०६: एंजल ब्रोकिंग लिमिटेडने ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षाचे परिणाम जाहीर केले. आर्थिक वर्ष २०२१च्या तिस-या तिमाहीच्या रु. ३१५६ दशलक्षच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न रु. ४१८९ दशलक्ष झाले आहे. तिमाही-दर-तिमाही आधारावर यात ३३ टक्क्यांची वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २० मधील रु. ७५४७ दशलक्षच्या तुलनेत ७२% वार्षिक वृद्धीसह आर्थिक वर्ष २१ मध्ये ते १२,९९० दशलक्ष झाले आहे.
कंपनीने ईबीटीडीएमध्ये ३४% टक्क्यांची त्रैमासिक वृद्धी घेतली आहे. ते तिस-या तिमाहीच्या रु. १०९३ दशलक्षच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत रु. १४६३ दशलक्ष झाले आहे. आर्थिक वर्ष २०२१च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचे ईबीटीडीए मार्जिन (निव्वळ उत्पन्नाच्या % नुसार) ४९% वर स्थिर राहिले आहे. कंपनीचा कर पश्चात नफा तिस-या तिमाहीच्या रु. ७३२ दशलक्षच्या तुलनेत त्रैमासिक ३९% वृद्धीसह चौथ्या तिमाहीत रु.१०२० दशलक्ष झाला आहे. तर आर्थिक वर्ष २०२० च्या रु. ८६२ दशलक्षच्या तुलनेत २४३% वार्षिक वृद्धीसह आर्थिक वर्ष २१ मध्ये रु. २८९१ दशलक्ष झाले आहे. एंजल ब्रोकिंगने चौथ्या तिमाहीत ०.९६ दशलक्ष नवे क्लाईंट जोडले आहेत. गेल्या तिमाहीच्या तुलनेत यात ८७%ची वाढ झाली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २१ मध्ये वार्षिक ३२२% वृद्धीसह २.३६ दशलक्ष नवे क्लाईंट जोडले आहेत.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे अध्यक्ष आणि एमडी श्री दिनेश ठक्कर म्हणाले, “ देशातील आघाडीच्या ब्रोकरपैकी एक असल्याने आम्ही आर्थिक वर्ष २०२१ मध्ये विक्रमी वृद्धी नोंदवली आहे. तसेच अनेक टप्पेही गाठले. उदा. आर्थिक वर्ष २०२१ मधील चौथ्या तिमाहीत आणि वित्तवर्ष २०२१ मध्ये अनुक्रमे १ दशलक्ष आणि २.४ दशलक्ष ग्राहक नोंदणीचा सर्वाधिक उच्चांक गाठला. त्यामुळे एनएसईवरील सक्रिय ग्राहकवर्गातील मार्केट शेअर, एकूण एडीटीओ तसेच एकूण रिटेल इक्विटी टर्नओव्हर मार्केट शेअरमध्ये लक्षणीय वाढ झाली.
आम्ही आर्थिक वर्ष २०२१ मधील चौथ्या तिमाहीत अनुक्रमे ४,१८९ दशलक्ष आणि १,०२० दशलक्ष रुपये एवढे करानंतरचे उत्पन्न व नफा नोंदवला आहे. कंपनीच्या अॅसेट लाइट मॉडेलमुळे कॅश निर्मिती आणि नियमित डिव्हिडंट पेआऊटला गती मिळाली. करानंतरच्या नफ्यातील ३५% म्हणजे १,०४० दशलक्ष रुपयांचा डिव्हिडंट कंपनीने डिव्हिडंट पेआऊट म्हणून वितरीत केला.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नारायण गंगाधर म्हणाले, “भारतातील सर्वात मोठी विश्वासनीय आणि प्रतिष्ठित फिनटेक कंपनी बनण्याचा आमचा उद्देश आहे. या अभूतपूर्व वृद्धीच्या केंद्रस्थानी भारत असल्याने, या सर्व इंडस्ट्रीजच्या वृद्धीत डिजिटायझेशन खूप महत्त्वाची भूमिका बजावेल. ब्रोकिंग क्षेत्रात, एंजेल ब्रोकिंगने पूर्णपणे विकसित डिजिटल ब्रोकरमध्ये रुपांतर करून स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. या वृद्धीच्या प्रवासासाठी तो पूर्णपणे सज्ज आहे. ग्राहकांचा अनुभव सतत वाढवण्यावर आमचे लक्ष असतके. यामुळे प्रत्येक भारतीयासाठी पहिल्या पसंतीचा फिनटेक भागीदार होण्याकडील आमच्या प्रवासास गती मिळेल.”