स्थैर्य, सातारा, दि. १७ : अंगणवाडी सेविकेचा कोरोना पॉझेटिव्ह रिपोर्ट आल्याने विडणी गावात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने संपूर्ण गांव भितीच्या सावटाखाली आले आहे.
फलटण तालुक्यातील सर्वात मोठे विडणी गांव असून विडणी गावाने आतापर्यंत काळजी घेऊन कोरोना पासून दूर ठेवण्यात लोकांना यश आले होते परंतु विनापरवानगी घेऊन येथिल५१वर्षीय अंगणवाडी सेविका२९ जून रोजी आपली तब्बेत बरोबर नसल्याचे कारण सांगून रजेवर होती त्यानंतर हडपसर(पुणे) येथे टॉन्सिलचे अॉपरेशन केले असल्याचे समजते. पुणे(हडपसर) येथे मुलीच्या घरी अनेक दिवस राहील्या असून त्यानंतर विडणी येथे दि.१२जूलै रोजी घरी आल्यानंतर त्यांना सर्दी खोकला घसा खवखवणे अशी लक्षणे जाणवू लागल्याने तिने विडणी येथिल एका खाजगी दवाखान्यात उपचार घेतले.यावेळी त्यांची रक्त लघवी पिंपरद येथिल पँथॉलॉजी टेक्निशियने विडणी येथिल खाजगी दवाखान्यात येऊन चेक केली. संबधित महीलेचे रिपोर्ट पाहून औषधोपचार करणेत आले तरीसुद्धा संबधित महिलेस ञास कमी झाला नसल्याने त्यांनी पुणे येथे परत जाऊन एका खाजगी लँब मध्ये तपासणी केली असता संबधित बाधित महिलेचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला असल्याची माहीती समजली आहे.
फलटण येथिल प्रशासकीय महसुल यंत्रणा, आरोग्य विभाग, पोलिस पाटील व विडणी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सरपंच यांनी संबधित बाधित महिलेच्या घरी भेट देऊन ट्रँव्हल हिस्ट्री, त्यांच्या संपर्कातील आलेल्यांची माहीती घेतली.संबधित बाधित महिलेच्या संपर्कातील खाजगी डॉक्टर,कंपाउडर,लँब टेक्निशियन,घरातील एक व्यक्ती अशी एकूण अकरा लोकांना हायरिस्क मध्ये ठेवण्यात आले असल्याचे प्रांतधिकारी डॉ.शिवाजी जगताप यांनी माहीती दिली आहे.
विडणी गावात अगोदरच बाहेर गावाहून आलेल्या कोरोना पॉझेटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील काही व्यक्ती आल्या होत्या गावाचे नशिब भल्यावर म्हणून संपर्कातील लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलते.परंतु विडणी गांव बफर झोन करणेत आले होते आज विडणी गांवतील बाधित महिलेचा असलेला परिसर अभंग वस्ती ते चिंचेचा मळा कँटोन्ट मेन झोन करणेत आला आहे.
संबधित बाधित व्यक्ती सह विनापरवानगी विडणी पुणे प्रवास करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याच्या सुचना प्रांतधिकारी डॉ शिवाजी जगताप यांनी दिल्या असून विडणीत आता पर्यत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या १०/१२ जणावर गुन्हे दाखल करणेत आले आहेत.
खाजगी डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या पेशंट पण संबधिताचा रिपोर्ट येईपर्यंत टेशन मध्ये आले आहेत.