
दैनिक स्थैर्य । दि. २१ ऑक्टोबर २०२२ । सातारा । प्रतिनिधी कोरोना सारख्या महामारीच्या काळात प्रामाणिकपणे काम केलेल्या अंगणवाडी शिक्षिका आणि सेविका यांना त्या काळातील कामाचा भत्ता मिळावा या मागणीसाठी गेले नऊ दिवस जिल्हाधिकारी कार्यालयावर पूर्व प्राथमिक शिक्षिका सेवा आणि सेविका संघटनाचे आंदोलन सुरू होते या आंदोलनाला बुधवारी दिशा मिळाली कोरोना काळातील कामाचे पैसे दिले जातील असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन नऊ दिवसानंतर आज मागे घेण्यात आले 2020 ते 2022 या दरम्यान सातारा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कंटेनमेंट झोन परिसरातील सर्वेक्षण आणि इत्यादी तांत्रिक कामे अंगणवाडी सेविकांना देण्यात आली होती ही कामे अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी पार पाडल्याचे प्रतिपादन अंगणवाडी शिक्षिका सेविका संघाचे महासचिव शौकत भाई पठाण यांनी निवेदनाद्वारे सांगितले होते मात्र या कामाचा करोणाकाळातील परतावा कोणत्याही सेविकांना न मिळाल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्या नऊ दिवसापासून ठिया दिला होता वेगवेगळ्या तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी टप्प्याटप्प्याने या आंदोलना त सहभाग नोंदवला होता बुधवारी सुद्धा झालेल्या जोरदार आंदोलनात हजारो अधिक महिला आंदोलन सहभागी झाल्या होत्या जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दुपारी तीन वाजता यासंदर्भात अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला या चर्चेमध्ये अंगणवाडी सेविकांना करोना काळातील भत्ता देण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले त्यामुळे सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाचे आंदोलन मागे घेण्यात आले तसेच इतर अनुषंगिक मागण्यांवर सुद्धा यावेळी चर्चा करण्यात आली.