एकाच कुटुंबातील चार जण पॉझिटिव्ह आल्याने अंदोरीकर अस्वस्थ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 स्थैर्य, खंडाळा, दि. 29 : अंदोरी, ता. खंडाळा येथील मुंबई वरून आलेल्या 43 वर्षाच्या  करोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या प्रथम पत्नी व त्यानंतर वडिल व मुलगा असे आणखी दोन म्हणजे एकाच कुटुंबातील तब्बल चार जण बाधित झाल्याने अंदोरीने पॉझिटिव्हचा चौकार मारला आहे. एकाच कुटुंबातील चार जण पॉझिटिव्ह आल्याने अंदोरीकर अस्वस्थ झाले आहे. हाय व लो रिस्क संपर्कात आलेल्यांची धाकधुक वाढु लागली आहे.

एक एक करीत आकडा वाढू लागल्याने प्रशासनाबरोबर ग्रामस्थांची धावपळ वाढली आहे. संपूर्ण अंदोरी सील करण्यात आली असून हाऊस टु हाऊस सर्व्हे केले जात आहेत. खंडाळा तालुक्यात  करोना  चा शिरकाव वाढु लागला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गावाबरोबरच वाडी वस्तीही सुन्न होऊ लागली आहे. अंदोरी गावाचीही तीच तर्‍हा झाली आहे. मुंबई येथून अंदोरी येथील कांचनवस्तीवर आलेल्या एका कुटुंबाला  करोना  ची लागण झाली.  प्रथम 43 वर्षीय एक जणाचा  करोना   रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे घरातील कुटुंबासह हाय रिस्कच्या आठ जणांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यातील पुन्हा त्याची पत्नी पॉझिटिव्ह झाली. तर आज पहाटे आलेल्या रिपोर्ट नुसार त्याच कुटुंबातील वडिल व मुलगा असे आणखी दोन जण पॉझिटिव्ह आल्याने पुरती अंदोरी हादरली. आता अंदोरीतील एकाच कुटुंबातील चार जण पॉझिटिव्ह निघाल्याने अंदोरीकरांची धाकधुक वाढुन हा आकडा आणखी किती वाढणार याची भिती निर्माण झाली आहे. अंदोरी गाव कंटेनमेंट झोनमध्ये आल्याने संपूर्ण गाव लॉक केले असून घराघरात आरोग्य खात्याच्या अकरा पथकांद्वारे सर्व्हे केला जात आहे. पण दररोज वाढणारा आकडा चिंतेची बाब होऊन बसली आहे. अंदोरीकरांचे जनजीवन विस्कळीत आले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!