दैनिक स्थैर्य । दि.१५ जानेवारी २०२२ । फलटण । उत्तरप्रदेश येथे झालेल्या फोर्थ नॅशनल चॅम्पियनशिप एक हजार पाचशेमध्ये फलटण तालुक्यातील आंदरुड गावचे सुपुत्र ओंकार गिरीगोसावी यांनी मिळवले गोल्ड मेडल मिळवले आहे. उत्तरप्रदेश मध्ये नॅशनल स्पोर्ट फॅडरेशन ऑफ इंडिया वतीने भरवण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये फलटण तालुक्यातील आंदरुड गावचे सुपुत्र चि. ओमकार राजेंद्र गिरीगोसावी याने एक हजार पाचशेमध्ये मीटर रनिंग मध्ये उत्तम कामगिरी दाखवून गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. तसेच तीन हजार मीटर मध्ये त्याने सिल्वर मेडल मिळवलेले आहे.
या कामगिरीचे सर्व स्थरावरून कौतुक करण्यात येत आहे. वेदात्री व्हेंचर्स एलएलपी यांच्यावतीने चि. ओंकार राजेंद्र गिरीगोसावी आणि प्रशिक्षक अजित कर्णे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वेदात्री व्हेंचर्स यांच्या वतीने संतोष गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, नेपाळ येथे होणाऱ्या इंटरनॅशनल रनिंग स्पर्धेमध्ये जाणाऱ्या ओंकार चा येणारा सर्व खर्च वेदात्री व्हेंचर्स करेल व पुढील वाटचालीसाठी ओंकारला शुभेच्छा दिल्या.
यावेळी C.M.D. संतोष गुरव, M.D. समाधान क्षीरसागर, C.E.O. विजयकुमार क्षीरसागर, सचिन फुले, किरण कर्णे, सौरभ आगम यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत कार्य्रक्रम संपन्न झाला.