दैनिक स्थैर्य । दि. १९ एप्रिल २०२३ । पंढरपूर । दि. 14 एप्रिल 2023 रोजी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपुर्ण देशात मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. पंढरपूरमध्येही विविध ठिकाणी जयंतीनिमित्त महामानवास अभिवादन करण्यात आले. या सर्वांमध्ये एक आगळ्यावेगळ्या पध्दतीचा अभिनव उपक्रम महर्षी वाल्मिकी संघ या सामाजिक संघटनेकडून राबविण्यात आला. चंद्रभागेच्या पात्रात होडीमध्ये आकर्षक पध्दतीची सजावट करुन निळ्या पताका फडकावत महामानव डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जयभीम च्या जयघोषाने सबंध चंद्रभागेच्या वाळवंटाचा परिसर दणाणुन गेलेल्या आढळला.
यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब अधटराव यांनी केले. यावेळी कुमार संगीतराव, सतीश नेहतराव हे ट्रस्टी उपस्थित होते.
यावेळी गणेश अंकुशराव नागनाथ इंगळे अनिल अधटराव विष्णू बंगाळे रामभाऊ कोळी सुरज कांबळे आप्पा करकमकर निलेश चंदनशिवे गणेश भंडारे आकाश खिलारे बेंबळे पाटील अनेक कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.
चंद्रभागेच्या पात्रामध्ये एका होडीत बसुन भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन केले. व चंद्रभागेच्या पात्रातून नावेतून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली व घोषणा देण्यात आल्याची माहिती महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.